हा पती भारीच हिम्मतवाला! गर्लफ्रेंडला वाचवण्यासाठी घेतली अशी रिस्क...की तुम्ही याला सलाम ठोकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 18:10 IST2021-08-20T18:00:43+5:302021-08-20T18:10:37+5:30
सध्या इन्स्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय. यातील पती, पत्नी और वोह हा लव्ह ट्रँगल पाहुन तुम्ही पोट धरून हसाल.

हा पती भारीच हिम्मतवाला! गर्लफ्रेंडला वाचवण्यासाठी घेतली अशी रिस्क...की तुम्ही याला सलाम ठोकाल
सोशल मिडियावर कपल्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. यातील अनेक व्हिडिओ खुप मजेशीर असतात. सध्या इन्स्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय. यातील पती, पत्नी और वोह हा लव्ह ट्रँगल पाहुन तुम्ही पोट धरून हसाल.
यातील पतीने आपल्या प्रेयसीला पत्नी पासून असे काही लपविले की तुम्ही याच्या टॅलेंटची दाद द्याल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की घराच्या बाहेर एक गाडी उभी आहे. पत्नी त्या कारमध्ये बसायला येतेय आणि तिचा पती अगदी साळसूदपणे कारचा दरवाजा उघडतो. पत्नी आता बसते इतक्यात एक ट्वीस्ट येतो. हा ट्वीस्ट साँस बहु सिरियलमधील ट्वीस्टपेक्षा काही कमी नाही. पत्नी आत बसते इतक्यातच तो चटकन मागचा दरवाजा उघडतो ज्यातून त्याची गर्लफ्रेंड बाहेर पडते आणि पळत सुटते. तेवढ्यात त्याच्या पटकन लक्षात येतं की गर्लफ्रेंडची चप्पल कारच्या दरवाज्या खालीच पडली आहे. तो लगेच ती चप्पल उचलतो आणि तिच्याकडे फेकतो. पतीदेवांनी आपल्या बायकोला काही कळून नये म्हणून कोणाताही सुगावा राहणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. आणि होत तसंच. पत्नी काही कळत नाही आणि तो आरामात गाडीत बसून पत्नीसोबत निघुन जातो.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ hepgul5 या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावर अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी पतीदेवांची ही आयडिया भावलीय पण तुम्ही अशी रिस्क घ्यायला जाऊ नका!