शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

मी रोज एक पेग घेते, तोच आमचा डोस; दारूचं महत्त्व सांगणाऱ्या महिलेचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 14:47 IST

दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन; दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा

दिल्ली: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. आज रात्री १० वाजल्यापासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन असेल. पुढील सोमवारपर्यंत दिल्लीत लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा करताच दारुच्या दुकानांवर एकच झुंबड उडाली. आठवड्याची सोय करण्यासाठी सगळ्याच तळीरामांनी दुकानं गाठली. लॉकडाऊनची घोषणा होताच दारु विकणाऱ्या दुकानांसमोर मोठ मोठ्या रांगा लागल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. खान मार्केट, गोल मार्केटमधील दारुच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी जमली. यामध्ये अनेक जण विनामास्क होते. तर सोशल डिस्टन्सिंगचेदेखील तीन तेरा वाजले होते.दिल्लीमधील शिवपुरी गीता वसाहतीत असलेल्या एका दारुच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दारू हेच औषध असल्याचं ही महिला सांगत होती. 'मी एक बाटली आणि दोन क्वॉर्टर घ्यायला आले आहे. इंजेक्शननं फायदा होत नाही. अल्कोहोलनं फायदा होतो. इथे आलेली जितकी माणसं आहेत, जी दारू पितात, ती अगदी व्यवस्थित राहतील. मद्यपी सगळे उत्तम राहणार. आमच्यावर औषधाचा काही परिणाम होत नाही. आमच्यावर फक्त दारूचा परिणाम होतो,' असं ही महिला सांगत होती. मी ३५ वर्षांपासून दारु पितेय. इतक्या वर्षात मी कोणताही दुसरा डोस घेतला नाही. रोज एक पेग घेते. तोच आमचा डोस. दिल्लीत एक आठवड्याचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. पण या कालावधीत दारुची दुकानं सुरू राहायला हवीत. मला आम्हाला डॉक्टरांकडे, रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत आम्हाला आवश्यकता वाटली नाही. यापुढेही वाटणार नाही, असं या महिलेनं सांगितलं. सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या