VIDEO : पनीर फॅक्टरीमध्ये कसं बनवलं जातं? व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 13:30 IST2024-06-07T13:30:15+5:302024-06-07T13:30:46+5:30
How paneer made in factory : पनीर फॅक्टरीमध्ये कसं तयार केलं जातं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण बघणार आहोत.

VIDEO : पनीर फॅक्टरीमध्ये कसं बनवलं जातं? व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...
How paneer made in factory : पनीरचे वेगवेगळे पदार्थ लोक आवडीने खातात. पनीर लहान मुलांसोबत मोठ्यांनाही खूप आवडतं. पनीरचे खायला टेस्टी लागतं, सोबतच त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पण हे पनीर फॅक्टरीमध्ये कसं तयार केलं जातं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण बघणार आहोत. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात पनीर कसं बनवलं जातं हे दाखवण्यात आलंय.
@thefoodiehat नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका व्यक्तीने आनंद कंपनीच्या पनीर बनवण्याच्या फॅक्टरीमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दाखण्यात आलं आहे की, पनीर कसं बनवलं जातं. ही फॅक्टरी उत्तर प्रदेशात आहे. ज्यात दाखवण्यात आलं आहे की, पनीर किती स्वच्छता सांभाळून बनवलं जातं.
सगळ्यात आधी दुधापासून पनीर बनवण्याची प्रोसेस केली जाते. नंतर पनीरचे तुकडे एका डब्यात टाकून दाबले जातात जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल. नंतर पनीर पाण्यात टाकून थंड केलं जातं. नंतर वेगवेगळ्या साइजमध्ये कापलं जातं. पनीर कापल्यानंतर पॅक केलं जातं.
या व्हिडीओला आतापर्यंत १३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, हे खरंच भारतात आहे का?, तर दुसऱ्याने लिहिलं की, पनीर तयार झाल्यावर याची टेस्टींग कशी होते?