ना ४ ना ५ ना १०....शोधा 'या' फोटोत किती प्राणी आहेत? भलेभले झाले शोधून हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:16 IST2021-09-22T16:46:56+5:302021-09-22T17:16:30+5:30

फोटोतील काही प्राणी पटकन दिसतात. पण काही प्राण्याना ओळखणं अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला फोटोचा कोपरान कोपरा बारकाईने आणि हुशारीने बघावा लागेल.

How many animals can you see in this optical illusion | ना ४ ना ५ ना १०....शोधा 'या' फोटोत किती प्राणी आहेत? भलेभले झाले शोधून हैराण....

ना ४ ना ५ ना १०....शोधा 'या' फोटोत किती प्राणी आहेत? भलेभले झाले शोधून हैराण....

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो काही सामान्य  फोटो नाही तर खास आहे. कारण या एकाच फोटोत अनेक प्राणी आहेत. ते प्राणी किती आणि कोणते आहेत हे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. तसा हा जुना फोटो आहे. पण पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देत आहेत. कुणी म्हणत आहेत की, फोटोत चार प्राणी आहेत तर कुणी सांगतय ९ आहेत. पण हे उत्तर देणं इतकं सोपं नाही. मात्र, काही लोकांना यात किती आणि कोणते प्राणी आहेत हे स्पष्टपणे दिसलं. 

फोटोतील काही प्राणी पटकन दिसतात. पण काही प्राण्याना ओळखणं अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला फोटोचा कोपरान कोपरा बारकाईने आणि हुशारीने बघावा लागेल. चला तुम्हीही प्रयत्न करून बघा की, तुम्ही यात किती प्राणी शोधू शकता. 

तुम्हाला जर वाटत असेल की, तुम्ही यातील सर्वच प्राण्यांना ओळखता किंवा ओळखू शकता तर हा फोटो बघा आणि लागा कामाला. याने टाइमपास तर चांगला होईल, सोबतच मेंदूलाही चांगली चालना मिळेल. तसेच प्राण्यांची ओळखही पक्की होईल. लहान मुलांनाही तुम्ही हे दाखवू शकता.

ज्या लोकांना वाटतं की, या व्हायरल झालेल्या फोटोत १६ प्राणी आहेत, त्यांचं उत्तर बरोबर आहे. जे प्राणी यात दाखवण्यात आले आहेत त्यातील सर्वातआधी दिसतात हत्ती, गाढव, कुत्रा, मांजर, साप, डॉल्फिन, कासव, मासा. त्यासोबतच इतरही प्राणी यात शोधू शकता.
 

Web Title: How many animals can you see in this optical illusion