वादळ येताच घाबरली मनीमाऊची पिल्लं; कोंबडीनं लगेचच पंखाखाली घेतलं; क्यूट फोटो नेटिझन्सना भावला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 18:37 IST2022-06-02T15:46:50+5:302022-06-02T18:37:49+5:30
आम्ही तुम्हाला असा एक फोटो दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुम्हाला मनापासून आनंद देताना भावुकही करेल. तुम्हाला प्राण्यांमधील माणुसकीचे दर्शनही होईल.

वादळ येताच घाबरली मनीमाऊची पिल्लं; कोंबडीनं लगेचच पंखाखाली घेतलं; क्यूट फोटो नेटिझन्सना भावला!
माणसांची प्राण्यांशी मैत्री असते तशी प्राण्यांचीही प्राण्यांसोबत मैत्री असते. विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला याचाच प्रत्यय देणारे छायाचित्र दाखवणार आहोत. ते पाहुन तुम्हाला आमचे म्हणने पटेलच पण तुम्हाला प्राण्यांमधील माणुसकीचे दर्शनही होईल.
सोशल मिडियावर अनेक फोटो व्हायरल होतात. यातील काही फोटो तुम्हाला हसवतात तर काही भावुक करतात. आम्ही तुम्हाला असा एक फोटो दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुम्हाला मनापासून आनंद देताना भावुकही करेल.
A hen taking care of frightened kittens during a storm.. 😊 pic.twitter.com/f6osykKBnk
— Buitengebieden (@buitengebieden) June 1, 2022
फोटोत तुम्हाला एक कोंबडी दिसेल. पण त्या कोंबडीच्या पंखांखाली उबेला मांजरीची पिल्लं दिसतील. हे पाहुन तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोंबडीच्या पंखाखाली तिच्याएवजी मांजरीचं पिल्लं काय करतायत? या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच खरं माणसुकीचं दर्शन. ही मांजरीची पिल्लं वादळाला घाबरलेली आहेत आणि आसरा म्हणून कोंबडीच्या पंखाखाली उबेला बसली आहेत. मुख्य म्हणजे या कोंबडीने तिच्या पिल्लांना देते तसाच आसरा या मांजरीच्या पिल्लांना दिला आहे. ही तिची पिल्ल नाहीत मांजरीची आहेत म्हणून तिने कोणताही भेदभाव केलेला नाही.
प्राण्यांमधील माणूसकीचे हे उदाहरण माणसांनाही लाजवेल. यातून आपण नक्कीच धडा घेऊ शकतो. ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाल्यावर अनेक ट्वीटरकरांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. त्यातील अनेकांनी माणसानेही यातून काहीतरी शिकावे. कोणताही भेदभाव न करता अडलेल्या माणसाला मदत करावी असेच म्हटले आहे. एकाने असे म्हटलंय की अशा सुंदर गोष्टींची मानवी जीवनाला गरज आहे.