Courier guy carries daughter : 'बाप' फोटो! लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 06:23 PM2021-03-31T18:23:15+5:302021-03-31T18:26:30+5:30

Courier guy carries daughter :  ती सहा महिन्यांची होती तेव्हापासून तिच्या वडिलांसोबत दररोज नोकरीच्या ठिकाणी जात आहे.

Heartwarming courier guy carries daughter inside delivery box to take care of her while working | Courier guy carries daughter : 'बाप' फोटो! लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय 

Courier guy carries daughter : 'बाप' फोटो! लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय 

Next

सोशल मीडियावर एक कुरिअर बॉय आणि त्याच्या चिमुकल्या लेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येईल हा कुरिअर बॉय आपल्या मुलीला सांभाळायला कोणीच नाही म्हणून स्वत:सोबत सगळीकडे फिरवत आहे. एका डिलिव्हरी बॉक्समध्ये बसलेली या माणसाची चिमुकली तुम्हाला दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

चीनमधील दोन वर्षांची ली फेईर ही मुलगी  ती सहा महिन्यांची होती तेव्हापासून तिच्या वडिलांसोबत दररोज नोकरीच्या ठिकाणी जात आहे.  तिचे वडील तिच्याबरोबर बाईकवरुन शहरभर फिरतात. म्हणून तिला डिलिव्हरी बॉक्समध्ये ठेवतात. फेईर ही खूप क्यूट आणि सकारात्मक आहे.  कारण तिचे हास्य पाहून तिच्या वडिलांना काम करण्याची नवी उम्मेद मिळते. 

या डिलिव्हरी बॉक्समध्ये डायपर व फीडिंग बॉटलसोबत मऊ गादीसुद्धा असते. एका कुरिअर बॉयने आपल्या मुलीला कामात असताना तिची देखभाल करण्यासाठी डिलिव्हरी बॉक्समध्ये, तात्पुरते पाळणा घेऊन जाण्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कुरियर बॉयनं स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, '' मीआपल्या मुलीसह शहरभर डिलिव्हरी करतो.  काही कारणांमुळे मी फेईरला सोबत घेऊन मे २०१९ मध्ये काम करण्यास सुरवात केली. हे काही सोपे नव्हते, अनेकदा आम्ही काही कठीण क्षणांतून गेलो.'' तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत

सुरुवातीला  ली जेव्हा आपल्या मुलीसह लोकांना  अन्न पुरवायचे तेव्हा तिला काही मीटर अंतरावर ठेवायचे. कारण फेईरसोबत पाहिल्यानंतर लोक काय म्हणतील याची  याची त्यांना कल्पना नव्हती. तुम्ही मुलीसोबत डिलिव्हरीसाठी का येता? तिची आई कुठे आहे? असे प्रश्न मला लोकांनी विचारू नये असं वाटत होतं.  पण जेव्हा काही ग्राहकांनी फेईरसाठी फळं आणि खाऊ दिला तेव्हा माझा विचार बदलला आणि मी तिलाही सोबत घेऊन जायला लागलो. टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

Web Title: Heartwarming courier guy carries daughter inside delivery box to take care of her while working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.