VIDEO : इतका खतरनाक स्टंट तुम्ही कधी पाहिला नसेल, Fast n Furious मधील सगळे सीन विसराल..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:31 PM2021-05-11T16:31:21+5:302021-05-11T16:49:46+5:30

डोळ्यांवर विश्वास न बसणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर एखाद्या गेमचा वाटतो, पण हा व्हिडीओ गेमचा नसून खरा आहे. 

Guy escapes police amazingly viral video people in shock after watching | VIDEO : इतका खतरनाक स्टंट तुम्ही कधी पाहिला नसेल, Fast n Furious मधील सगळे सीन विसराल..

VIDEO : इतका खतरनाक स्टंट तुम्ही कधी पाहिला नसेल, Fast n Furious मधील सगळे सीन विसराल..

Next

सोशल मीडियावर नेहमीच असं काही बघायला मिळतं जे बघितल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. लोक नेहमीच असे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात की, बघितल्यावर बघणारे लोक बघतच राहतात. इतकंच नाही तर डोक्यात सतत प्रश्न येत राहतात की, असं कसं झालं. असाच डोळ्यांवर विश्वास न बसणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर एखाद्या गेमचा वाटतो, पण हा व्हिडीओ गेमचा नसून खरा आहे. 

या व्हिडीओत एक कार दिसत आहे. जी समोर पोलिसांची उभी कार पाहून असा स्टंट करते, ज्याचा विचारही करवत नाही. गाडीचा ड्रायव्हर पोलिसांना असा चकमा देतो की, विश्वासच बसत नाही. ड्रायव्हर कार अंडरपासमध्ये टाकतो, तरी तो तिथून सुखरूप बाहेर पडतो. १० सेकंदाच्या या व्हिडीओ कार अंडरपास क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जाते. 

या व्हिडीओबाबत असं सांगितलं जात आहे की, पोलिसांपासून पळत असलेल्या या व्यक्तीचं नशीबही चांगलं निघालं. कारण तो कार एका गाडीवर जम्प करत नेतो. म्हणजे त्याची गाडी खाली पडत नाही. तो दुसरीकडे सुखरुप निघतो. 

हा खतरनाक सीन पाहिल्यावर अनेकांना वाटतं की, हा व्हिडीओ फेक आहे आणि काही म्हणत आहेत की, हा व्हिडीओ गेमचा सीन आहे. काहींना वाटतं असं सत्य असूच शकत नाही. व्हिडीओवर कमेंटचा पाऊस आला आहे. एका व्यक्तीने कमेंट केली की, हा सीन पाहून असं वाटतं की, पुढील फास्ट अॅन्ड फ्युरिअस सिनेमात हाच सीन वापरला जाईल. 
 

Web Title: Guy escapes police amazingly viral video people in shock after watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.