‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:02 AM2023-12-19T11:02:44+5:302023-12-19T11:04:56+5:30

Gulabi Sharara flipbook : या व्हिडिओत एक महिलेची डान्स करतानाची ड्राईंग आहे. हे जेव्हा एकत्र फ्लिप केलं जातं तेव्हा असं वाटतं जणू महिला खरंच डान्स करत आहे.

Gulabi Sharara : Man made artwork flipbook video has more than 35 million views watch here | ‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ

‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ

Gulabi Sharara flipbook : सोशल मीडियावर सध्या 'गुलाबी शरारा' ट्रेंड होत आहे. इंदर आर्याने हे गाणं गायलंय. तर आता या गाण्यावर हजारो रिल्स बनवले गेले. अनेकांच्या तोंडी सध्या याच गाण्याचे बोल आहेत. अशात या गाण्याचा एक वेगळा व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात एका अमित नावाच्या आर्टिस्टने फ्लिप बुक बनवलं आहे.

या व्हिडिओत एक महिलेची डान्स करतानाची ड्राईंग आहे. हे जेव्हा एकत्र फ्लिप केलं जातं तेव्हा असं वाटतं जणू महिला खरंच डान्स करत आहे. बॅकग्राउंडला गुलाबी शरारा गाणं वाजत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 35 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. 

लोकांनी हे आर्टवर्क खूप आवडलंय. कुमाऊंनी गाणं गुलाबी शरारा सध्या सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालं आहे. या गाण्यातील सिग्नीचर स्टेप्सवर रील्सचा जणू पाऊस आला आहे. 

अमित नावाच्या या कलाकाराला फ्लिप बुक बनवण्यासाठी 155 फ्रेम बनवाव्या लागल्या. त्याने कागदावर साडी नेसलेल्या महिलेचं एक ड्राईंग बनवलं आहे. त्याने सांगितलं की, हे बनवण्यासाठी त्याला 11 दिवसांचा वेळ लागला.

7 डिसेंबरला इन्स्टावर पोस्ट केल्यानंतर या व्हिडिओला 35 मिलियनपेक्षा वेळा बघण्यात आलं आहे.  सोशल मीडिया यूजर अमितचं भरभरून कौतुक करत आहेत. अनेकांनी कमेंट केल्या की, या गाण्यावरील आतापर्यंतचा हा सगळ्यात चांगला व्हिडीओ आहे.

Web Title: Gulabi Sharara : Man made artwork flipbook video has more than 35 million views watch here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.