शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

नवऱ्यामुलाने मागितला १० लाखाचा हुंडा, मुलीकडच्यांनी दिला लाथाबुक्क्यांचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:10 IST

लग्नाच्या (Marriage) मंडपातच नवरीच्या नातलगांनी नवऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल (Ghaziabad Viral Video) झाला आहे. दरम्यान, हे सगळं प्रकरण नंतर पोलीस (Police) स्टेशनपर्यंत पोहोचलं. यानंतर उलटपक्षी नवऱ्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला.

लग्नाच्या (Marriage) मंडपातच नवरीच्या नातलगांनी नवऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल (Ghaziabad Viral Video) झाला आहे. दरम्यान, हे सगळं प्रकरण नंतर पोलीस (Police) स्टेशनपर्यंत पोहोचलं. यानंतर उलटपक्षी नवऱ्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला.

गाझियाबादच्या साहिबाबबादमधली ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. साहिबाबादमध्ये (Sahibabad Groom Viral Video) एक लग्न होतं. लग्नाची वरात आली होती आग्राहून. धूमधडाक्यात नवऱ्यामुलाचं स्वागत नवरीमुलीच्या नातलगांनी केलं. सनई-चौघड्यांचं बॅकग्राऊंड मंद म्युझिक सुरु होतं. नटून-थटून आलेल्या नातलगांच्या कुजबूज होती. यजमानी स्वागताच्या गडबडीत होते. लग्नाचा उत्साह दोन्हीकडच्या नातलगांमध्ये होते. अशातच लग्न लागयच्या नेमक्या क्षणी नवऱ्याच्या मुलाच्या वडिलांनी १० लाख रुपये कॅश हुंडा मागितला आणि वातावरणं चांगलंच तापलं. नवऱ्यामुलाच्या वडिलांनी सांगितलं की पैसे नाही दिले, तर लग्न लावणार नाही!

नवऱ्यामुलाच्या वडिलांनी केलेल्या या मागणीनंतर अखेर नवरी मुलीचे वडील नरमले. त्यांनी 3 लाख रुपये कॅश आणि एक लाख रुपयांची अंगठी आधीच दिली होती. पण तेवढ्यावरच नवऱ्या मुलाच्या वडिलांचं समाधान झालं नव्हतं! ते 10 रुपये कॅशच्या अटीवर अडून राहिले. बराच वेळ त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु होते. पण नवरी मुलीकडच्यांच्या संयमाचा अखेर बांध फुटला आणि सुरु झालं घमासान. नवरी मुलीच्या नातलगांनी नवरदेवालाच हुंड्यात चांगलाच प्रसाद (Groom Beaten Before Marriage Video) द्यायला सुरुवात केला. लाथा-बुक्क्या-धक्के-बाचाबाची-असं सगळं सुरु झालं.

या सगळ्यात आगीत तेल ओतावं, अशी आणखी गोष्ट घडली. ती म्हणजे ज्या मुलाशी लग्न लावलं जाणार होतं, त्याची आधीच दोन-तीन लग्न झालेली असल्याची धक्कादायक बाब मुलाकडच्यांनी लपवून ठेवली होती. तेही मुलीकडच्यांना या सगळ्या राड्यादरम्यान कळलं! यानंतर आग्राहून आलेली वरात नवरी मुलकडच्यांनी थेट पोलीस स्टेशनातच नेली आणि या सगळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली.

आता पोलीसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक चौकशी केली जाते आहे. फसवणूक करुन हुंडा मागणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयावर आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय. हुंडा देणं आणि घेणं हा खरंतर कायद्यानं गुन्हा आहे. मात्र तरिही सर्रासपणे अजूनही हुंड्यापायी लग्न मोडणं, जुळवणं, असले प्रकार सुरु असल्याचंही या निमित्तनं स्पष्ट झालंय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारीTwitterट्विटरmarriageलग्नdowryहुंडा