Video : समुद्रात स्वीमिंग करत होती तरूणी, अचानक समोर आला शार्क मासा आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:49 IST2021-02-19T15:48:40+5:302021-02-19T15:49:11+5:30

Social Viral : असा दावा केला जात आहे की, समुद्रात या तरूणीवर शार्कने हल्ला केला. हा व्हिडीओ नाजी अल तखीम नावाच्या ट्विटर यूजरने त्यांच्या अकाउंटवर शेअर केलाय.

Girl was enjoying swimming in the sea when the shark attack | Video : समुद्रात स्वीमिंग करत होती तरूणी, अचानक समोर आला शार्क मासा आणि....

Video : समुद्रात स्वीमिंग करत होती तरूणी, अचानक समोर आला शार्क मासा आणि....

Social Viral : समुद्रात(Sea) हजारो प्रकारचे जीव असतात. यातील काही जीव हे शांत तर काही घातक असतात. अनेकदा तर काही जीव मनुष्यांवरह हल्लाही करतात. असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video) झाला आहे. यात एक तरूणी समुद्रात एन्जॉय करताना दिसत आहे. पण तिच्यासोबत अचानक असं काही होतं की, ती जोरजोरात ओरडू लागते.

असा दावा केला जात आहे की, समुद्रात या तरूणीवर शार्कने हल्ला केला. हा व्हिडीओ नाजी अल तखीम नावाच्या ट्विटर यूजरने त्यांच्या अकाउंटवर शेअर केलाय. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, जेव्हा तरूणी समुद्रात स्वीमिंग करत होती. तेव्हा बोटवर असलेले काही लोक तिला सांगतात की, तिच्याकडे शार्क मासा येतोय. हे ऐकून तरूणी घाबरू लागते. ती किती घाबरलेली आहे तुम्ही व्हिडीओत बघू शकता. (हे पण वाचा : बाबो! ३ हजार डायनामाइट लावून काही सेकंदात उडवला ट्रम्प यांचा ३४ मजली प्लाझा, व्हिडीओ व्हायरल)

जेव्हा ती शार्क तिच्याकडे येताना बघते तर आणखी जोरात ओरडू लागते. ती मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागते. यादरम्यान ती काही वेळा पाण्यात बुडालेलीही दिसते. असं वाटतं जणू शार्कने तिला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न केला असावा. हे सगळं सुरू असताना व्हिडीओ संपतो. यानंतर हे समजू शकलं नाही की, तरूणी सुखरूप बाहेर की तिच्यासोबत काही झालं. 
 

Web Title: Girl was enjoying swimming in the sea when the shark attack