तीन खतरनाक गेंड्यासोबत मस्ती करताना दिसली तरूणी, असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहून अवाक् झाले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:46 IST2022-02-04T15:30:09+5:302022-02-04T15:46:29+5:30
Girl Playing with Rhinoceros: हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण गेंड्यासोबत अशाप्रकारे मस्ती करताना याआधी कधी बघायला मिळालं नाही.

तीन खतरनाक गेंड्यासोबत मस्ती करताना दिसली तरूणी, असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहून अवाक् झाले लोक
Girl Playing with Rhinoceros: तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर कितीतरी खरतनाक व्हिडीओ पाहिले असतील. पण आता आम्ही जो व्हिडीओ तुम्हाला दाखवत आहोत तो बघून तुमच्या अंगावर काटे येतील. या व्हिडीओत एक तरूणी तीन खतरनाक गेंड्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती एका गेंड्याला किसही करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण गेंड्यासोबत अशाप्रकारे मस्ती करताना याआधी कधी बघायला मिळालं नाही.
हा व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं जरा अवघड आहे. कारण हा हा पाहिल्यावर तुम्ही विचारात पडाल की, असंही होतं का? कारण यात एक तरूणी तीन गेंड्यांसोबत आरामात बसलेली दिसत आहे. ती एका गेंड्याला मिठी मारून बसली आहे. इतकंच नाही तर त्याला किसही करत आहे.
हा व्हिडीओ rhinohuose नावाच्या एका अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ १५ जानेवारीला अपलोड केलाय. तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडीओला ८० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडीओ लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कारण त्यांनीही कधी असा व्हिडीओ पाहिला नाही. एकाने लिहिलं की, 'तरूणी मूर्ख आहे. गेंडा भडकला तर तिचं काही खरं नाही'. दरम्यान, जंगलात हत्तीनंतर सर्वात शक्तीशाली प्राणी गेंडा हाच आहे. गेंडा तर कधी कधी हत्तीसोबतही भिडतो. आपल्या टोकदार शिंगाने तो सेकंदात कुणाचाही जीव घेऊ शकतो.