Video : 'आली लहर केला कहर, एकाच माणसाला दोनदा धडक', पापा की परीचा प्रताप बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:46 IST2022-11-21T16:44:17+5:302022-11-21T16:46:09+5:30
सध्या सोशल मीडियावर papa ki pari पापा की परी चे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी एकाच माणसाला दोन वेळा धडक देताना दिसत आहे.

Video : 'आली लहर केला कहर, एकाच माणसाला दोनदा धडक', पापा की परीचा प्रताप बघा
सध्या सोशल मीडियावर papa ki pari पापा की परी चे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. महिला कशा स्कुटी चालवतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना धडक मारतात या घटना काही कमी नाहीत. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पापा की परी एकाच माणसाला दोन वेळा धडक देताना दिसत आहे.
हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र नेटकऱ्यांनी यावर संतापजनक प्रतिक्रियी ही दिल्या आहेत. जर गाडी चालवता येत नाही तर का चालवता. नाहक समोरच्या माणसाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्याला गंभीर दुखापतही होऊ शकते याचे गांभीर्य नाही का असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.
एक बार तो ठीक था मगर दोबारा चाचा को ठोक दिया 😁😥 pic.twitter.com/b9wX1KHXQB
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 17, 2022
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की स्कुटी चालवताना या मुलीकडुन अॅक्सीलेटर फिरवले जाते आणि ती समोरच्या माणसाला धडकते. त्याची माफी मागते. इथपर्यंत तरी ठीक आहे मात्र थोडं पुढे गेल्यावर ती पुन्हा त्याच माणसाला जोरात धडकते आणि दोघेही पडतात. आता बोला काय म्हणायचे याला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.