Viral Video: जिगल जिगल गाण्यावर तरुणीने केली खास स्टेप, पाहा तुम्हाला जमतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:55 IST2022-05-31T13:54:02+5:302022-05-31T13:55:53+5:30

बॉलीवुडच्या धकधक गर्लला याची भुरळ पडली आहे, मग सामान्यजन कसे मागे राहतील. नुकताच एका तरुणीने दिल्लीच्या मेट्रोमध्ये या गाण्यावर हुक स्टेप करत डान्स केला. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आहे.

girl dancing on Jigal Jigal song video goes viral on internet | Viral Video: जिगल जिगल गाण्यावर तरुणीने केली खास स्टेप, पाहा तुम्हाला जमतेय का?

Viral Video: जिगल जिगल गाण्यावर तरुणीने केली खास स्टेप, पाहा तुम्हाला जमतेय का?

सोशल मिडियाच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आता बघा ना सध्या 'जिगल जिगल' या गाण्यावर थिरकण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. जो तो या गाण्यावर हुक अप स्टेप करतोय अन् त्याचे रिल्स बनवतोय. 'जिगल जिगल' हे गाणं ये ड्यूक आणि जोन्स एक्स लुईस यांच रॅप साँग आहे. नुकतंच माधुरी दिक्षीतनंही या गाण्यावर रिल तयार केलेलं. जर बॉलीवुडच्या धकधक गर्लला याची भुरळ पडली आहे, मग सामान्यजन कसे मागे राहतील. नुकताच एका तरुणीने दिल्लीच्या मेट्रोमध्ये या गाण्यावर हुक स्टेप करत डान्स केला. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की एक तरुणी पोल्का डॉट जम सुटमध्ये आहे. चालत्या मेट्रोमध्ये ती उभी आहे. समोर ती कॅमेरा ठेवते अन् साँग सुरु होतं. लगेचच ती नाचायला सुरुवात करते. ती या गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. आजुबाजुच्या कोणाकडे तिचं जास्त लक्ष नाही. पण तरीही तिच्या धाडसाला सलाम करायला पाहिजे. 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर kashikabassi या अकाऊंटने अपलोड केला आहे. २१ मेला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १५ हजारापेक्षा जास्त लाईक व ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. नेटकरी मात्र या तरुणीचं कौतुक करताना थांबत नाहीयेत.

 

Web Title: girl dancing on Jigal Jigal song video goes viral on internet