शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

Gaza attack : लाईव्ह शोदरम्यान अचानक झाला बॉम्बब्लास्ट; समोर आला अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 17:33 IST

Gaza attack : इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून आता कोणत्याही ठिकाणी काही घडल्यास ती माहिती वेगानं व्हायरल होत असते. अंगावर काटा येईल असा  बॉम्बब्लास्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेरुसलेममध्ये (Jerusalem) पुन्हा हिंसाचार पेटला आहे. दर वेळेप्रमाणेच आपापल्या तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे हा वाद उफाळून आला आहे. इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

गाझा पट्टीच्या शहरातून गेल्या तीन दिवसांत 1500 हून अधिक रॉकेटचा मारा करणाऱ्या जहाल गट हमासविरोधात इस्त्रायलने (Israel attack) जोरदार वार केला आहे. प्रत्यूत्तरादाखल केलेल्या कारवाईत हमासला (Hamas) मोठा झटका बसला आहे. त्याचे 11 कमांडर मारले गेले आहेत. या रक्तरंजित संघर्षात पॅलेस्टाइनचे 70 लोक मारले गेल्याचे समजते आहे. तर इस्त्रायलने सांगितले की, आपले 6 लोक मारले गेले आहेत. या दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्येयुद्धास तोंड फुटू शकते असा इशारा दिला आहे. 

तेथिल रहिवासी असेल्या एका व्यक्तीच्या घराबाहेर हा स्फोट झाला.  ते पाहून लाईव्ह शोमधल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. माया हुसेनने इन्स्टाग्राम आयजीटीव्हीवर हा व्हिडिओ दोन भागांत शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिलं आहे, 'प्रत्येकाने जागे व्हा. गाझामध्ये हल्ले, स्फोट होत आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. 

20 ते 30 हजार रॉकेट...

इस्त्रायल सैन्याच्या अंदाजानुसार हमासकडे सध्या 20 ते 30 हजार रॉकेट आहेत. आता आम्ही हमासला कायमचे शांत करूनच थांबू, असे इस्त्रायलने ठरविले आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी या दोघांमध्ये पुन्हा युद्ध सुरु होण्याचा इशारा दिला आहे. 

इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा काय आहे? -

शत्रू राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी ही यंत्रणा आहे तसंच राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोन इस्रायली कंपन्यांनी अमेरिकेच्या मदतीने ही सुरक्षा यंत्रणा विकसित केली आहे.

 इस्रायलच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळे आणि छोटे रॉकेट्सर्स आयर्न डोम तंत्रज्ञानाच्या साह्याने हवेतल्या हवेतच नष्ट केली जातात. हवाई हल्ल्यांपासून आपल्या शहरांचे, नागरिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने इस्रायलने २०११ मध्ये आयर्न डोम यंत्रणेचा सुरक्षा दलांमध्ये समावेश केला. फक्त शहराच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांनाच नष्ट करण्यासाठी इस्रायल ही यंत्रणा वापरतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाGaza Attackगाझा अटॅक