Teacher reads elon musk as kharbuja: बाबो! फळ्यावरचं Elon Musk चं स्पेलिंग वाचून शिक्षिका म्हणाली 'खरबूजा'; व्हिडीओ पाहून लोट पोट होऊन हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 17:01 IST2021-03-23T17:00:05+5:302021-03-23T17:01:30+5:30
Teacher reads elon musk as kharbuja : व्हिडीओत एक शिक्षिका एलन मस्कचं स्पेलिंग उच्चारताना चुकून मस्कमेलन(Muskmelon) असं म्हणते.

Teacher reads elon musk as kharbuja: बाबो! फळ्यावरचं Elon Musk चं स्पेलिंग वाचून शिक्षिका म्हणाली 'खरबूजा'; व्हिडीओ पाहून लोट पोट होऊन हसाल
टेस्ला (Tesla) कंपनीचे सीईओ (CEO) एलन मस्क (Elon Musk) मागच्या एका वर्षापासून खूप चर्चेत आहेत. जगातील सगळ्यात श्रीमंत माणसांमध्ये एलन मस्क यांचा समावेश होतो. सोशल मीडियावर एलन मस्क याचे खूप किस्से व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक शिक्षिका एलन मस्कचं स्पेलिंग उच्चारताना चुकून मस्कमेलन(Muskmelon) असं म्हणते. मराठी आणि हिंदीत मस्कमेलनचा अर्थ खरबूज किंवा खरबूजा असा होतो.
हा व्हिडीओ एक आठवडा आधी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एलन मस्कला (Elon Musk) मस्कमेलन वाचताना खूप विनोदी वाटतं. सुरूवातीला ही शिक्षिका स्पेलिंग वाचायला जाते. त्यानंतर मस्कमेलन असं म्हणते. इतकचं नाही तर या शब्दाचा हिंदी अर्थ खरबुजा असल्याचं ही सांगते. सावधान! जास्तवेळ बसून काम केल्यानं कमी वयातच होऊ शकतो कमरेचा आजार; या उपायांनी मिळवा आराम
सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर मिसेस राजेश्वरी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून राजेश्वरीनं आपल्या अकाऊंटवरून गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. याव्यतिरिक्त या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षावही केला आहे. बापरे! मासिक पाळीदरम्यान तरूणीच्या डोळ्यातून आले रक्ताचे अश्रू; समोर आला 'हा' दुर्मिळ आजार