VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:14 IST2025-11-23T10:14:02+5:302025-11-23T10:14:32+5:30
Marco Friedl interview video: प्रश्न ऐकून खेळाडूला धक्काच बसला, मग किंचित हसत त्याने सांगितले, मी दुसऱ्या टीमचा खेळाडू आहे.

VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
Marco Friedl interview anchor video: जर्मन बुंडेसलीगा (German Bundesliga) फुटबॉल लीगमध्ये नुकत्याच झालेल्या एका सामन्यानंतर एक अत्यंत गमतीशीर आणि गोंधळात पाडणारी घटना घडली, ज्यामुळे स्काय स्पोर्ट्स जर्मनी (Sky Sports Germany) च्या एका रिपोर्टरला लाईव्ह टीव्हीवर (live TV) माफी मागावी लागली. ईनट्राख्त फ्रँकफर्ट आणि वेर्डर ब्रेमेन यांच्यात फुटबॉलचा सामना झाला. त्यात फ्रँकफर्टने ४-१ असा मोठा विजय मिळवला. सामना संपल्यानंतर, हरलेल्या वेर्डर ब्रेमेन संघाचा कर्णधार मार्को फ्रीडल (Marco Friedl) पोस्ट-मॅच मुलाखतीसाठी आला. त्यावेळी महिला अँकरने त्याला चक्क, जिंकल्यानंतर कसं वाटतंय? असा सवाल केला आणि सगळाच गोंधळ झाला.
नेमका काय घडला प्रकार?
स्काय स्पोर्ट्सची रिपोर्टर अँकर कॅथरिना क्लेनफेल्ड्ट (Katharina Kleinfeldt) मुलाखतीसाठी उभी होती. फ्रीडलने नुकताच फ्रँकफर्टच्या एका माजी सहकाऱ्याशी जर्सीची अदलाबदल केली होती, त्यामुळे त्याने फ्रँकफर्टची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे अँकरचा गोंधळ उडाला. क्लेनफेल्ड्टनी मुलाखत सुरू करताना, "आम्ही नक्कीच ईनट्राख्त (फ्रँकफर्ट) बद्दल बोलू इच्छितो. तुम्ही ४-१ ने विजय मिळवला, हीच अपेक्षित सलामी कामगिरी होती का?" असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून फ्रीडलला धक्का बसला आणि त्याने किंचित हसत सांगितले, "मी वेर्डर ब्रेमेनचा खेळाडू आहे."
#SKY Interview mit #Werder Kapitän Marco Friedl. Zur eigenen Bewertung… 🙄#SGESVW#Fachkräftemangelpic.twitter.com/eteXV2Zw5s
— Dschalalabad (@dschalalabad) August 23, 2025
अँकरने LIVE प्रसारणात मागितली माफी
आपली चूक लक्षात येताच क्लेनफेल्ड्ट यांनी तात्काळ ऑन-एअर (on-air) फ्रीडलची माफी मागितली आणि हात मिळवला. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, "सामन्यानंतर फ्रँकफर्टची जर्सी पाहून मी काही क्षणासाठी गोंधळून गेले आणि ही चूक झाली." या घटनेवर प्रतिक्रिया देताना, फ्रीडल जर्मन वृत्तपत्र 'बिल्ड'ला (BILD) म्हणाला, "असा अनुभव मला पहिल्यांदाच आला. ९० मिनिटांपूर्वी मी तिच्याशी बोललो होतो, तरीही तिने मला ओळखले नाही. हे थोडे विचित्र आणि हास्यास्पद आहे."
या हलक्याफुलक्या क्षणाव्यतिरिक्त, फ्रीडलने ब्रेमेनच्या खराब कामगिरीबद्दलही तीव्र निराशा व्यक्त केली. "पराभवातून शिकण्यासारख्या फार गोष्टी आहेत. आम्ही खेळताना स्वतःच्या हाफमध्ये अडकलो आणि फ्रँकफर्टला सहज गोल करण्याची संधी दिली. जर आम्ही सुधारणा केली नाही, तर भविष्यातील सामने कठीण होतील," असे त्याने स्पष्ट केले. यापुढे सांघिक चुका सुधारून अधिक आक्रमक खेळ करण्याची गरज आहे, यावर त्याने भर दिला.