Funny Video : दारूच्या नशेत मेहुणीच्या गळ्यात टाकला हार, मग स्टेजवरच नवरदेवाची करण्यात आली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:25 IST2022-06-23T13:23:31+5:302022-06-23T13:25:40+5:30
Funny Viral Video : या व्हिडीओत नवरदेव दारूच्या नशेत नवरीऐवजी मेहुणीच्या गळ्यात हार टाकतो. त्यानंतर नवरदेवासोबत जे झालं ते नवरदेव आयुष्यभर लक्षात ठेवेल.

Funny Video : दारूच्या नशेत मेहुणीच्या गळ्यात टाकला हार, मग स्टेजवरच नवरदेवाची करण्यात आली धुलाई
Funny Viral Video : भारतात सध्या लग्नांचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर तुम्ही लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लग्नाचे हे वेगवेगळे व्हिडीओ लोकांना खूपच आवडतात. जे नवरी-नवरदेवासंबंधी असतात. सध्या लग्नाचा एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत नवरदेव दारूच्या नशेत नवरीऐवजी मेहुणीच्या गळ्यात हार टाकतो. त्यानंतर नवरदेवासोबत जे झालं ते नवरदेव आयुष्यभर लक्षात ठेवेल.
व्हिडीओत बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर उभे आहेत. दोघांच्याही हातात हार आहे. दरम्यान नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार टाकते. तेच जेव्हा नवरदेवाची वेळ येते तेव्हा तो नवरीऐवजी बाजूला उभ्या असलेल्या मेहुणीच्या गळ्यात हार टाकतो. यामुळे मेहुणी इतकी चिडते की, ती त्याला स्टेजवर मारू लागते.
बिहार में शराबबंदी बा ... 🤔😅🤣😂🥃 pic.twitter.com/MiWYfF2N2T
— Vikki1975 (@Vikki19751) June 21, 2022
व्हिडीओच्या सुरूवातीला तुम्ही बघू शकता की, नवरदेव दारूच्या नशेत टल्ली आहे. तो स्टेजवर डोलतच उभा आहे. त्याच्या एका मित्राने त्याला धरून ठेवलं आहे. तो त्याला सपोर्ट देत आहे जेणेकरून तो खाली पडू नये. जर मित्र नसता तर नवरदेव कधीच खाली पडला असता. तुम्ही बघू शकता की, नवरदेवाला दारूच्या नशेत बघून नवरीचा मूड खराब झाला आहे. पण तरीही ती कशीतरी त्याच्या गळ्यात हार टाकते.
हा व्हिडीओ Vikki1975 नावाच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ फारच मजेदार आहे. नवरदेवाने हा कारनामा केल्यावर त्याची मेहुणी त्याच्या चार-पाच कानशिलात लगावते. खरंतर हा खऱ्या लग्नातील व्हिडीओ नाही. हा व्हिडीओ मनोरंजनासाठी नाटकीय पद्धतीने बनवला आहे. पण तरीही लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 24 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.