बबड्या चांगला का वाईट ठाऊक नाही, पण...; महाराष्ट्र पोलिसांकडून 'कहानी में ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:51 PM2020-08-20T16:51:35+5:302020-08-20T16:59:07+5:30

ट्विट्सच्या माध्यमातून हटके आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मीम्सद्वारे जगजागृती केल्यामुळे काही मीम्स तुफान व्हायरल होतात.

Funny tweet for corona awareness agga bai sasubai meme shared by Maharashtra police | बबड्या चांगला का वाईट ठाऊक नाही, पण...; महाराष्ट्र पोलिसांकडून 'कहानी में ट्विस्ट'

बबड्या चांगला का वाईट ठाऊक नाही, पण...; महाराष्ट्र पोलिसांकडून 'कहानी में ट्विस्ट'

googlenewsNext

लोकांना संदेश देण्यासाठी किंवा एखाद्या नियमाचं पालन करण्यास सांगण्यासाठी महाराष्ट्र पोलीस नेहमीच वेगवेगळे मीम्स शेअर करत असतात. त्यातील अनेक मीम्स पाहून महाराष्ट्राची जनता खळखळून असते. ट्विट्सच्या माध्यमातून हटके आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मीम्सद्वारे जगजागृती केल्यामुळे काही मीम्स तुफान व्हायरल होतात. सध्या  मुंबई पोलिसांनी असंच एक ट्विट केलं आहे. याट्विटनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. 

महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्विट करताना चक्क झी मराठीवरील मालिकेतील एका प्रसिद्ध पात्राचं उदारण दिलं आहे. हे पात्रम्हणजे सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय असलेला बबड्या. 'अग्गंबाई सासुबाई' मालिकेतील आसावरीच्या बबड्याचं मिम पोलिसांनी शेअर केलं आहे. सध्या 'अग्गंबाई सासुबाई' मालिकेची बरिच चर्चा होते. खासकरून बबड्याच्या चित्रविचित्र वागण्यावरून अनेक मीम्स व्हारल केले जातात. यावरून पोलिसांनी बबड्याचे उदाहरण देत मीम तयार केलं आहे. 

या फोटोत तुम्ही पाहू शकता बबड्याचा एक मास्क घातलेला फोटो शेअर करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचं या मिममध्ये म्हटलं आहे. बबड्याचे प्रताप आणि वागण्याची पद्धत सगळयांनाच माहिती आहे. विशेष म्हणजे बबड्या आता सुधारलाय असं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे'. असं या ट्विटच्या माध्यमातून पोलिसांनी सांगितलं आहे. या माध्यामातून मास्त वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी जनतेला केलं आहे. 

हे पण वाचा

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

सनकी हुकूमशहाचा आणखी एक फतवा; पाळीव कुत्र्यांना मारुन खाण्याचे आदेश

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

Web Title: Funny tweet for corona awareness agga bai sasubai meme shared by Maharashtra police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.