नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी याहून मजेदार व्हिडीओ मिळू शकेल का? आधी बघा मग तुम्हीच ठरवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:20 IST2026-01-01T12:01:48+5:302026-01-01T12:20:41+5:30
Funny Viral Video : तेच तेच पाहून कंटाळा आला असेल तर आम्ही आपल्यासाठी एक मजेदार व्हिडीओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडीओ बघून नव्या दिवसाची सुरूवात आपण हसतमुखाने करू शकता.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी याहून मजेदार व्हिडीओ मिळू शकेल का? आधी बघा मग तुम्हीच ठरवा
Funny Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कंटेंटची खाण म्हटलं जातं. कारण यावर सतत काहीना काही नवीन, मजेदार बघायला, वाचायला मिळतं. आज तर नव्या वर्षातला पहिला दिवस आहे. त्यामुळे आजही कंटेंटचा महापूर येईल. पार्टीचे फोटो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा हे सगळं सुरू राहणार. पण तेच तेच पाहून कंटाळा आला असेल तर आम्ही आपल्यासाठी एक मजेदार व्हिडीओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडीओ बघून नव्या दिवसाची सुरूवात आपण हसतमुखाने करू शकता. चला तर पाहुयात नेमकं काय आहे या व्हिडिओत.
आता जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ चार व्हिडीओ मिळून बनवण्यात आला आहे. व्हिडिओत आधी बघू शकता की, दोन मुली एका स्कूटीवरून जात आहेत आणि कॅमेराकडे बघून त्यातील एक म्हणते की, 'स्वत:कडे लक्ष दे, आमचं काय, आम्ही आधीपासूनच चुकीच्या मार्गावर आहोत'. त्यानंतर दोन तरूणांचा व्हिडीओ येतो, त्यातील एक जण म्हणतो की, 'थोडं आणखी पुढे या, आम्ही सुद्धा त्याच मार्गावर आहोत. तिघे मिळून सोबत जाऊ'. त्यानंतरच्या व्हिडिओत एक पोलीस दिसतो, तो म्हणतो की, 'थोडं आणखी पुढे या, त्याच रस्त्यावर आम्हीही उभे आहोत'. आता त्यानंतरच्या चौथ्या व्हिडिओत नेमकं काय घडतं ते तुम्हीच बघा.
Wait for end 😅.... Sab ek hi raste p h😆 pic.twitter.com/bWwKwK289d
— Avika Yadav (@bby_Sid) December 31, 2025
हा व्हायरल झालेला व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @bby_Sid नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सगळे एकाच मार्गावर आहे'. आतापर्यंत या व्हिडिओला ६६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे.