शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: लग्नात वराच्या मित्रांनी वधुला दिलं विचित्र गिफ्ट, व्हिडिओ पाहुन तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 10:38 IST

नवरदेवाच्या मित्रांनी नवरी-नवरदेवासोबत (Bride Groom Video) लग्नाच्या स्टेजवरच विचित्र मस्करी केल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video Viral) होत आहे. यात नवरदेवाच्या मित्रांनी नवरी-नवरदेवासोबत (Bride Groom Video) लग्नाच्या स्टेजवरच विचित्र मस्करी केल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आपल्याकडे आजकाल लग्नात गिफ्ट देणं, ही जणू एक परंपराच बनली आहे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. कधी कपलला सुट्टे पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी अतिशय महागडं गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ समोर येतो. मात्र आज जो व्हिडिओ समोर आला आहे, तो अतिशय वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. इतक्यात तिथे नवरदेवाचे मित्र येतात. सगळ्या आधी नवरदेवाचा एक मित्र पुढे येतो आणि नवरीच्या हातात हे युनिक गिफ्ट देऊन पुढे निघून जातो. यानंतर दुसरा मित्र डान्स करत तिथे येतो आणि नवरीच्या हातात झाडू देतो. यानंतर क्रमाने इतर मित्रही येतात आणि नवरीला स्वयंपाकघरातील वस्तू आणि इतर विचित्र गिफ्ट देतात.

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर brides_special नावाच्या अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. यावर कमेंट करू लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं की आता नवरी आणि नवरदेवासा घरातील सामान खरेदी करण्याची गरजच पडणार नाही आणि कमवण्याचीही गरज नाही. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहे. आणखी एकाने लिहिलं, अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही. यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न