VIDEO : असा टॅटू का काढला या माणसाने, बघून रागाने लाल झाली Mia Khalifa

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:20 IST2021-09-08T19:12:57+5:302021-09-08T19:20:47+5:30

दिल्लीच्या एका टॅटू आर्टिस्टने इन्स्टाग्रामवर मिया खलिफावरील प्रेम दाखवण्यासाठी आपल्या पायावर तिच्या चेहऱ्याचा टॅटू बनवण्याचा व्हिडीओ पोस्ट केला.

Former pornstar Mia Khalifa saw the tattoo of this Indian Fan she said such a thing in anger watch video | VIDEO : असा टॅटू का काढला या माणसाने, बघून रागाने लाल झाली Mia Khalifa

VIDEO : असा टॅटू का काढला या माणसाने, बघून रागाने लाल झाली Mia Khalifa

माजी पॉर्नस्टार मिया खलिफा सध्या तिच्या एका भारतीय फॅनवर चांगलीच संतापली आहे. कारण या भारतीय फॅनने त्याच्या पायावर मियाच्या चेहऱ्याचा टॅटू काढलाय. दिल्लीच्या एका टॅटू आर्टिस्टने इन्स्टाग्रामवर मिया खलिफावरील प्रेम दाखवण्यासाठी आपल्या पायावर तिच्या चेहऱ्याचा टॅटू बनवण्याचा व्हिडीओ पोस्ट केला.

एक इंडियन टॅटू आर्टिस्टने 'tattoo_artist_01' नावाच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एका टॅबलेटवर मियाचा ओरिजनल फोटो दाखवण्यात आला आणि मग पायावर टॅटू काढलेला दाखवला. 

चष्म्यातील लूकसाठी प्रसिद्ध मिया खलिफाचा फोटो टॅटूमध्येही जसाच्या तसा काढलाय. मिया खलिफाने गेल्यावर्षी तिच्या चष्म्याचा लिलाव केला होता. तिच्या या चष्म्यावर ७३ लाख रूपयांची बोली लागली होती. मियाने हे पैसे एका संस्थेला दान केले होते.

टॅटू पाहून मिया संतापली

अनेकांनी मियाच्या या टॅटूचं कौतुक केलं तर मियाने स्वत: हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि याला 'भयानक' असं म्हटलंय. व्हिडीओ शेअर करत मियाने लिहिलं की, 'हे भयानक आहे'. असं असलं तरी टॅटू आर्टिस्टने मियाच्या नकारात्मक प्रतिक्रियेकडे लक्ष दिलं नाही आणि तिला उत्तर त्याने लिहिलं की, '@miakhalifa आणि इन्स्टाग्राम फ्रेन्ड्सना ४ मिलियन व्ह्यूजसाठी धन्यवाद दिले.

दरम्यान, अशीच एक घटना २०१७ मध्ये पोर्तुगालमध्ये घडली होती. येथील अलेक्झांडर स्केट नावाच्या मियाच्या एका फॅनने माजी पॉर्न स्टारच्या चेहऱ्याचा टॅटू काढला होता. त्यावेळीही मिया तिच्या या फॅनवर संतापली होती. मिया म्हणाली होती की, 'माझे टॅटू काढणं बंद कर. हा काही फ्लर्टिंगचा प्रकार नाही. हे फारच विचित्र आहे'.
 

Web Title: Former pornstar Mia Khalifa saw the tattoo of this Indian Fan she said such a thing in anger watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.