वाह रे वाह! महिला सुंदर होती म्हणून पोलिसाने दिलं चलान, म्हणाला...रस्त्यावर होतील अपघात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 14:50 IST2019-06-11T14:46:01+5:302019-06-11T14:50:31+5:30
प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. पण तुमचं सौंदर्यच जर तुमच्यासाठी अडचण ठरत असेल तर? अनेकदा अशी उदाहरणे बघायला मिळतात.

वाह रे वाह! महिला सुंदर होती म्हणून पोलिसाने दिलं चलान, म्हणाला...रस्त्यावर होतील अपघात!
(Image Credit : The Business Journals) (प्रातिनिधिक फोटो)
प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. पण तुमचं सौंदर्यच जर तुमच्यासाठी अडचण ठरत असेल तर? अनेकदा अशी उदाहरणे बघायला मिळतात की, व्यक्तीचं सौंदर्यचं त्यांच्यांसाठी डोकेदुखी ठरते. असंच काहिसं उरूग्वेच्या पेसेंदू शहरात बघायला मिळालं. गेल्या काही दिवासांपासून इथे एक सुंदर महिला आणि एक ट्रॅफिक पोलीस चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहेत.
झालं असं की, इथे एक महिला तिच्या बाईकने जात होती. पण तिला हे माहीत नव्हतं की, पुढे तिच्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. ती जात असताना तिला एका पोलिसाने अडवले आणि हे म्हणून चलान दिलं की, तुम्हाला बघून रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यामुळे मोठी दुर्घटनाही होऊ शकते.
ट्रॅफिक पोलिसाने महिलेला दिलेल्या चलानावर त्याचा प्रेमाचा संदेशही दिला. त्याने स्पॅनिश भाषेत चलानावर लिहिले की, 'ती अमो' याचा अर्थ होतो की, माझं तुझ्यावर प्रेम आहे.
या घटनेमुळे संतापलेल्या महिलेने हे चलान सोशल मीडियात शेअर केलं. हे चलान पाहून लोकही हैराण झालेत. काही लोकांनी कमेंट करून पोलिसाला फ्लर्ट करणारा म्हटलं तर काहींनी त्याला नोकरीहून काढण्याची मागणी केली. नंतर हे प्रकरण मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं तेव्हा अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. असे मानले जात आहे की, जर पोलीस यात दोषी आढळला तर त्याला नोकरीवरून काढलं जाऊ शकतं.
आपण नेहमीच ट्रॅफिक पोलिसांचे वेगवेगळे किस्से भारतातील वेगवेगळ्या शहरातून ऐकत असतो. त्यांची चिरीमिरीही नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण अशाप्रकारे सुंदर आहे म्हणून एखाद्या महिलेला चलान दिल्याची ही पहिलीच घटना असावी.