फोटोत शोधायचा आहे 3 हा नंबर, तोही 3 सेकंदात; बरेच थकले, पाहा तुम्हीही ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:35 IST2025-11-19T17:34:25+5:302025-11-19T17:35:17+5:30
Optical Illusion: या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही तुमचा एखादा गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही जाणून घेऊ शकता. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फोटोत शोधायचा आहे 3 हा नंबर, तोही 3 सेकंदात; बरेच थकले, पाहा तुम्हीही ट्राय करा
Optical Illusion: रोज ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून मेंदूची कसरत करण्यास मदत मिळते. कारण या फोटोंमध्ये काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी काही चुका शोधायच्या असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही तुमचा एखादा गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही जाणून घेऊ शकता. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीच आपल्याला दिसत नाहीत. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. सोशल मीडियावरील असे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. कारण यातून चांगला टाइमपास होतो आणि मेंदूला चालनाही मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी जो फोटो आणला आहे त्यात तुम्हाला वेगवेगळ्या आकड्यांमध्ये 3 हा आकडा शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत अंकांची सीरीज दिलेली आहे. ज्यात 0 ते 9 सगळे अंक आहेत. पण यात 3 हा आकडा शोधणं फार अवघड झालं आहे. जो तुम्हाला केवळ 3 सेकंदात शोधायचा आहे. जास्त वेळ घेऊन तुम्ही नक्कीच शोधाल पण ठरलेल्या वेळेत शोधाल तर तुमच्या डोळ्यांची टेस्ट होईल.

जर तुम्हाला यातील 3 हा आकडा सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही जर तुम्हाला यातील 3 आकडा दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
जर अजूनही तुम्हाला यातील 3 हा आकडा सापडला नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही तो कुठे आहे ते बघू शकता.

वरच्या फोटोत आपण 3 हा आकडा कुठे आहे बघू शकता.
