VIDEO : ट्रेन-बस नाही, तर चक्क विमानात सीटवरुन भांडण; तिघांची एकाला बेदम मारहाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 20:14 IST2024-10-20T20:13:54+5:302024-10-20T20:14:26+5:30

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

fight over a seat in an airplane; Three beat one | VIDEO : ट्रेन-बस नाही, तर चक्क विमानात सीटवरुन भांडण; तिघांची एकाला बेदम मारहाण...

VIDEO : ट्रेन-बस नाही, तर चक्क विमानात सीटवरुन भांडण; तिघांची एकाला बेदम मारहाण...

Viral Video : तुम्ही अनेकदा ट्रेन आणि बसमध्ये जागेसाठी वाद/मारामारी झाल्याचे पाहिले असेल. पण, आजकाल विमानात जागेसाठी मारामारी होत आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईला जाणाऱ्या विमानात सीटवरुन काही प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काही प्रवाशांमध्ये सीटवरुन वाद सुरू असल्याचे दिसत आहे. पुढे हा वाद इतका टोकाला जातो की, प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू होते. व्हिडीओमध्ये 3-4 प्रवासी एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी एअर होस्टेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही तिचे ऐकत नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, विंडो सीटवर बसण्यावरुन हा वाद झाला होता. या घटनेने सोशल मीडियावर लोकांना विचार करायला भाग पाडले की, विमानात अशी घटना कशी घडू शकते? अशा घटना सहसा ट्रेन आणि मेट्रोमध्ये घडतात. पण आता विमानांमध्येही सीटवरून भांडणे होऊ लागली आहेत. 


 

Web Title: fight over a seat in an airplane; Three beat one