शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वडिलांनी ट्रॅफिक नियम मोडले म्हणून रागवली चिमुकली, म्हणाली आता याची शिक्षा तुम्हाला कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 3:04 PM

बऱ्याचदा वाहतूक पोलीस लोकांना पटवून देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत राहतात. सध्या सूरत पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो काही वेळातच व्हायरल झाला आहे.

जगात दररोज हजारो रस्ते अपघात होतात, ज्यात लोकांना आपला जीव गमवावा लागतो. विशेषतः भारतात रस्ते अपघातांची संख्या खूप मोठी आहे, आणि ही खूप मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच बऱ्याचदा वाहतूक पोलीस लोकांना पटवून देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत राहतात. सध्या सूरतपोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो काही वेळातच व्हायरल झाला आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप लोकांना आवडत आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शाळेत नियम मोडल्याबद्दल आपल्या लहान मुलीला फटकारत आहे. मुलीशी बोलत असताना तो गाडीला चुकीच्या बाजूला नेतो. हे पाहून ती लहान मुलगी तिच्या वडिलांना सांगते की आता तुमच्या चुकीबद्दल तुम्हाला कोण फटकारणार. कारण आता तुम्हीही शॉर्ट कटसाठी चुकीच्या मार्गाने गाडी फिरवली आहे. सूरतपोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “चुकीच्या बाजूला वाहन चालवणे टाळा.”

हा व्हिडीओ पोस्ट करत सुरत पोलिसांनी लिहिले, “चुकीच्या दिशेने वाहन चालवणे तुम्हालाच नाही तर तुमच्यासह इतर नागरिकांनाही नुकसान पोहोचवते. जेव्हा आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करू, तेव्हाच तरुण पिढीला त्यांचे महत्त्व कळेल आणि भविष्यात ते एक सुरक्षित चालक बनतील. ” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक ही क्लिप पोस्ट केल्याबद्दल सूरत पोलिसांचे कौतुक करत आहेत.

या व्हिडिओमध्ये चिराग त्रिवेदी आणि दर्शनी त्रिवेदी यांनी भूमिका केल्या आहेत. या लघु व्हिडिओद्वारे गुजरात पोलिसांनी सामाजिक संदेश दिला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी आपली प्रतिक्रिया वेगाने नोंदवायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने सांगितले की, जर तुम्हाला मुलीचा मुद्दाही समजला असेल तर क्वचितच कुणी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTrafficवाहतूक कोंडीcarकारSuratसूरतPoliceपोलिस