शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

‘बाप’ फोटो... लेकीच्या खांद्यावरचे तारे वडिलांनी न्याहाळले, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 9:57 PM

मुलगी ही बापाचा स्वाभिमान असते, त्याच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. असाच एका बाप-लेकीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कॅमेऱ्यानं अचूक टिपला.

ठळक मुद्देएक हजार शब्दही जे व्यक्त करू शकत नाहीत, ते एक फोटो बोलतोहा फोटो आहे, इम्फाळच्या पोलीस उपअधीक्षक Rattana Ngaseppa आणि त्यांच्या वडिलांचा. मुलगी ही बापाचा स्वाभिमान असते, त्याच्या मनाचा हळवा कोपरा असते.

आपल्या मुलानं किंवा मुलीनं आयुष्यात त्यांचं ध्येय गाठल्यानंतर, उंच भरारी घेतल्यानंतर आई-वडिलांना होणारा आनंद शब्दातीत असतो. त्याचप्रमाणे, आपल्या यशामुळे आई-वडिलांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यांत पाहताना प्रत्येक मुलामुलीच्या मनात दाटून येणाऱ्या भावनाही अवर्णनीयच. असाच एका बाप-लेकीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कॅमेऱ्यानं अचूक टिपला आणि हा हृद्य 'सोहळा' जगाने पाहिला, त्यांच्या मनाला भावला. एक हजार शब्दही जे व्यक्त करू शकत नाहीत, ते एक फोटो बोलतो - सांगतो, याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली.

हा फोटो आहे, इम्फाळच्या पोलीस उपअधीक्षक Rattana Ngaseppa आणि त्यांच्या वडिलांचा. आपल्या मुलीच्या युनिफॉर्मवरचे चमचमणारे तारे वडील अभिमानाने न्याहाळत आहेत. पोरीनं जिद्दीनं आपलं ध्येय गाठल्यानं त्यांना असीम आनंद झाला आहे. तर, त्यांच्या डोळ्यातील चमक पाहून रत्तना यांच्या चेहऱ्यावर गोड हसू फुललंय. ज्याच्या खांद्यावर बसून मोठी स्वप्नं पाहिली, ज्याचा हात धरून पहिलं पाऊल टाकलं, ज्याच्या चेहऱ्यावरचं समाधान रत्तना यांच्यासाठी नक्कीच खास आहे आणि तेच त्यांच्या स्मितहास्यातून दिसतंय.   

“श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी”, या कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील ओळींमुळे वडील आणि मुलीचं नाजूक, संवेदनशील नातं तितकंच हळुवारपणे व्यक्त होतं. मुलगी ही बापाचा स्वाभिमान असते, त्याच्या मनाचा हळवा कोपरा असते. तर वडील हे मुलीचं सर्वस्व असतं. या नात्यातील हा आपलेपणाचा ओलावा रत्तना आणि तिच्या वडिलांच्या फोटोतून सहज अभिव्यक्त होतोय. तो पाहून नेटिझन्सही भावुक झालेत. अनेकांचे डोळे पाणावलेत, कंठ दाटून  आलाय. काहींनी आपल्या भावना प्रतिक्रियांमधून व्यक्त केल्यात, तर हजारो नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्PoliceपोलिसTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया