शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 10:15 AM

ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हजारो रुपये कुटुंबाला मदत म्हणून मिळाले, या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात जाऊन याची पडताळणी केली

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षणासाठी मुलीच्या वडिलांनी गाय विकली अन् स्मार्टफोन खरेदी केलाहिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बातमी सोशल मीडियात पसरलीअभिनेता सोनू सूदनेही कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे सरसावला

नवी दिल्ली – सध्या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एक घटना सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे, यामध्ये गुंमर गावातील कुलदीप कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकली, आणि त्यातून मिळालेल्या ६ हजार रुपयातं स्मार्टफोन खरेदी केला, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, अभिनेता सोनू सूदही मदतीसाठी सरसावला, प्रशासन खडबडून जागे झाले.

ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हजारो रुपये कुटुंबाला मदत म्हणून मिळाले, या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने गावात जाऊन याची पडताळणी केली. त्यात सत्य उघड झालं. कुलदीप कुमार यांच्याकडे ७ जनावरे आहेत, तीन महिन्यापूर्वी त्यांनी गाय विकली, पण त्याआधीच मुलीच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन खरेदी केला होता असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलदीप यांच्याबाबत बातमी प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने मदतीसाठी गुंमर गावात धाव घेतली. याठिकाणी कुलदीप यांच्याकडे ७ जनावरे असून त्यांच्या दुधविक्रीतून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात असं निदर्शनास आलं.

तसेच त्यांच्या घराच्या जवळ सरकारी शाळा असतानाही कुलदीप यांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेतात, त्याचसोबत मुलांसाठी महागडी पुस्तके खरेदी करतात, कौटुंबिक वाद सुरु असल्याने सध्या कुलदीप यांचे कुटुंब जनावरांच्या गोठ्यात राहत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेत कुलदीप यांच्या घरी पोहचले. त्यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. कुलदीप यांनी गावातील सुरेंद्र मोहन यांना १० जलै रोजी ६ हजार रुपयांना गाय विकली, कारण  पावसाळ्यामुळे त्यांना गोठ्यात ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्याचसोबत कुलदीप यांनी मुलीसाठी ३ महिन्यापूर्वी म्हणजे ३० एप्रिलच्या दरम्यान स्मार्टफोन खरेदी केला होता.

अलीकडेच पंतप्रधान आवास योजनेतून कुलदीप कुमार यांना पंचायत समितीकडून घरासाठी पात्र ठरवण्यात आल्याचीही माहिती आहे. कांगडा जिल्हा प्रशासकीय अधिकारी राकेश प्रजापती म्हणाले की, ही बातमी पाहिल्यानंतर तहसिलदार आणि अधिकाऱ्यांना कुटुंबाची माहिती घेण्यास पाठवले, तेव्हा ही सगळी माहिती उघड झाली. कुलदीप यांनी इच्छेनुसार गाय विकली आणि गाय विकण्याचं कारणही वेगळे आहे. आम्ही कुलदीप यांना गाय पुन्हा देण्याची ऑफर दिली पण त्यांनी जागा नसल्याचं कारण देत नकार दिला असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'

...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणMobileमोबाइलSonu Soodसोनू सूद