शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

टार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली 'ही' शिक्षा, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 1:25 PM

प्रायव्हेट कंपन्यांमधील 'टार्गेट'चं टेन्शन काय असतं हे त्या कर्मचाऱ्यांनाच चांगलं माहीत. जगात काहीही झालं तरी टारगेट काही कमी होत नाहीत.

प्रायव्हेट कंपन्यांमधील 'टार्गेट'चं टेन्शन काय असतं हे त्या कर्मचाऱ्यांनाच चांगलं माहीत. जगात काहीही झालं तरी टार्गेट काही कमी होत नाहीत. नोकरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात टारगेट हा शनीसारखाच असतो. तो कधी कमी होत नाही, सतत वाढत असतो. टार्गेट पूर्ण न झाल्यास काय होतं? हे त्या कर्मचाऱ्यांना चांगलंच माहीत असतं. तुम्ही टार्गेट पूर्ण केल्यास नोकरी गेल्याचं किंवा ओरडा पडल्याचं ऐकलं असेलच. पण चीनच्या एक कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत जे केलं त्याला विचारही केला जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात बघायला मिळतंय की,  चीनमधील एका कंपनीने टारगेच पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत काय केलं. 

या वायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही लोक एका रस्त्यावर गुडघ्यावर चालत आहेत. त्यांच्यासमोर एक व्यक्ती झेंडा घेऊन चालतोय. सर्वच लोक हे सूटबूटात आहेत. हा व्हिडीओ SCMP ने ट्विटर पोस्ट केला आहे. ही पहिलीच वेळ नाहीये की, अशाप्रकारे चीनमध्ये एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांना शिक्षा दिली असेल. गेल्यावर्षीही अशी घटना घडली आहे. 

सकाळी कर्मचारी ऑफिसला पोहोचल्यावर त्यांना कळाले की, टार्गेट पूर्ण न केल्याने त्यांना शिक्षा मिळणार आहे. काय शिक्षा मिळणार हे कळाल्यावर त्यांना धक्काच बसला. रस्त्यावर ते गुडघ्यावर चालायला लागले. पण काही वेळाने पोलिसांनी हस्तक्षेप करुन हे सगळं थांबवलं. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वायरल झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर ही कंपनी अस्थायी रुपाने बंद करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियातून या कंपनीवर जोरदार टिकाही केली गेली. पण कर्मचाऱ्यांवरही काही लोकांनी टिका केली. कर्मचाऱ्यांनी तरी असं का केलं? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल