Video: ‘भारत माता की जय...’; वेरुळच्या कैलास मंदिरासमोर ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:57 IST2026-02-01T17:56:35+5:302026-02-01T17:57:11+5:30

ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Ellora Caves Video: ‘Bharat Mata ki Jai...’; Australian tourist shouts in front of Kailash Temple in Verul | Video: ‘भारत माता की जय...’; वेरुळच्या कैलास मंदिरासमोर ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा जयघोष

Video: ‘भारत माता की जय...’; वेरुळच्या कैलास मंदिरासमोर ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा जयघोष

Ellora Caves Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका पर्यटकाने महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरुळच्या ऐतिहासिक लेण्यांत ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून अनेक भारतीयांनी आनंद व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा वेरुळ लेण्यातील अनोखा अनुभव

ऑस्ट्रेलियातील पर्यटक डंकन मॅकनॉघ्ट (Duncan McNaught) हे वेरुळ लेण्यांना भेट देण्यासाठी आला होता. या भेटीदरम्यान त्याने आपला अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.


कैलास मंदिरात घोषणा...

व्हायरल व्हिडिओमध्ये डंकन मॅकनॉघ्ट हे एलोरा येथील कैलास मंदिरासमोर उभे राहून ‘भारत माता की जय’चा नारा देताना दिसतो. त्याच्या घोषणेनंतर तेथे उपस्थित पर्यटकांनीही तत्काळ प्रतिसाद देत जोरदार जयघोष केला. यानंतर तो ‘जय श्री राम’ अशी घोषणा देतो, ज्याला गर्दीतून पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. व्हिडिओच्या शेवटी त्याने आपण कैलास मंदिरात असल्याचे सांगितले.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल 

हा व्हिडिओ स्वतः डंकन याने शेअर केला आहे. व्हिडिओसोबत “मी माझ्या आधार कार्डसाठी तयार आहे का?” असे मजेशीर कॅप्शनही त्याने दिले आहे. हा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “आधार व्हेरिफिकेशन यशस्वी!” दुसऱ्याने म्हटले, “खूप सुंदर क्षण आहे.” तर तिसऱ्याने लिहिले, “भाऊ, तुझे आधार कार्ड लवकरच येईल!”

Web Title : एलोरा गुफाओं में ऑस्ट्रेलियाई पर्यटक ने लगाए 'भारत माता की जय' के नारे

Web Summary : ऑस्ट्रेलियाई पर्यटक डंकन मैकनॉघ्ट ने एलोरा गुफाओं की यात्रा के दौरान कैलाश मंदिर में 'भारत माता की जय' और 'जय श्री राम' के नारे लगाए, जिससे अन्य पर्यटक भी उत्साहित हो गए। उनका वीडियो इंस्टाग्राम पर वायरल हो गया।

Web Title : Australian Tourist Chants 'Bharat Mata Ki Jai' at Ellora Caves

Web Summary : An Australian tourist, Duncan McNaught, visiting Ellora Caves, enthusiastically chanted 'Bharat Mata Ki Jai' and 'Jai Shri Ram' at the Kailasa temple, eliciting cheers from fellow tourists. His video went viral on Instagram.