VIDEO: आईच्या मायेपुढे माज पडला फिका; पिल्लाला घाबरवणाऱ्या गेंड्याची हत्तीणीने उतरवली मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:13 IST2026-02-21T20:11:36+5:302026-02-21T20:13:43+5:30
Baby Elephant and rhino viral video: हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झालाय

VIDEO: आईच्या मायेपुढे माज पडला फिका; पिल्लाला घाबरवणाऱ्या गेंड्याची हत्तीणीने उतरवली मस्ती
Baby Elephant and rhino viral video: सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे किंवा लढाईचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका गेंड्याने हत्तीणीच्या पिल्लाला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, पण समोर उभ्या असलेल्या पिलाच्या आईच्या मायेपुढे आणि रागापुढे गेंड्याचा माज फिका पडला. या व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
हत्तीणीने गेंड्याला जन्माची अद्दल घडवली
व्हिडिओमध्ये सुरुवातीला एका जंगलात एक हत्तीण आणि तिचे पिल्लू शांतपणे चाललेले असते. त्यांच्या मागे दोन गेंडे चालताना दिसतात. अचानक एक गेंडा आक्रमक होतो आणि हत्तीच्या पिल्लाकडे वेगाने धाव घेतो. आपल्या पिल्लाला धोक्यात पाहून हत्तीण तातडीने वळते. ती आपली सोंड उंचावून गेंड्यावर इतक्या जोरात ओरडते की, बलाढ्य मानला जाणारा गेंडा जागीच थबकतो. हत्तीणीचा तो आक्राळविक्राळ अवतार पाहून गेंड्याचा पूर्ण 'माजच' उतरतो आणि तो लगेच शांत होतो. आईने गेंड्याला रोखल्याचे पाहून घाबरलेले पिल्लू पटकन पळत जाऊन आपल्या आईच्या जवळ सुरक्षित उभे राहते. हत्तीणीचा हा ४० सेकंदांचा व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिंकत आहे.
Momma elephant has had enough of a curious rhino getting too close to her calf pic.twitter.com/0vVExfDH1e
— Nature Unedited (@NatureUnedited) February 20, 2026
हा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @NatureUnedited नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत १ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, आईच्या रागापुढे आणि मायेपुढे कुणाचाच निभाव लागत नाही. तर काहींनी याला 'मातृप्रेमाचे' सर्वोत्तम उदाहरण म्हटले आहे. दरम्यान, आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाशी भिडायला तयार असते, हेच या व्हिडिओतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.