शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

बाईकवरील रोमान्सचे सत्य आले समोर! तरुणीने सांगितले कारण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:23 IST

काल छत्तीसगडमधील एका कपलचा बाईकवरील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत एक तरुणी बाईकच्या टाकीवर बसल्याचे दिसत होते.

काल छत्तीसगडमधील एका कपलचा बाईकवरील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत एक तरुणी बाईकच्या टाकीवर बसल्याचे दिसत होते. प्रेमी युगुलाचा चालत्या दुचाकीवर रोमान्स सुरू होता. या प्रेमी युगलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा बाईकवरील स्टंट या तरुणीने आपल्या पहिल्या प्रियकराला डिवचण्यासाठी केला होता, असं तिने पोलिसांना सांगितले आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी भिलाई येथे राहणाऱ्या दोन प्रेमी युगुलांना अटक केली असून त्यात दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. एक प्रेमी युगल रस्त्यावर रोमान्स करताना या व्हिडीओत दिसत आहे, तर दुसरे कपल त्यांचा व्हिडीओ बनवत होते.

भिलाईच्या रस्त्यावर केलेल्या या रोमान्सचा व्हिडीओ सोशल मीडियार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बाईकच्या टाकीवर बसलेली दिसत आहे, जी तिच्या प्रियकराला मिठी मारत असलेली दिसत आहे.तर मागील वाहनावर त्यांचे मित्र त्यांचा व्हिडीओ बनवत असल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यावर फिल्मी स्टाईलमध्ये केलेला हा रोमान्स सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. 

हे प्रकरण गांभीर्याने घेत दुर्ग पोलिसांनी प्रेमीयुगुलांचा शोध सुरू केला. ते जिथून बाहेर आले, तिथले सीसीटीव्ही कॅमेरे शोधून काढले. हे रोमान्स करणारे जोडपे ज्या बाईकमध्ये प्रवास करत होते त्या बाइकला नंबर प्लेट नव्हती, मात्र त्याच्या मागे व्हिडीओ बनवणारे दुसरे कपल पोलिसांनी ओळखले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्वांना पकडण्यात आले आहे.

भिलाईतील या घटनेनंतर दुर्गचे एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. असे प्रकार कोण करत असेल तर लगेच माहिती पोलिसींना देण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत.

खुल्लम खुल्ला प्यार! बाईकनंतर कपलचा कारचं सनरुफ उघडून रोमान्स, 'तो' Video तुफान व्हायरल

दुचाकीवर बसून अश्‍लील कृत्य करणाऱ्या या प्रेमीयुगुलांची पोलिसांनी चौकशी केली आहे. यात धक्कादायक बाब समोर आली.चौकशीदरम्यान आरोपींनी माजी प्रियकराला डिवचण्यासाठी  बाईकवर बसून स्टंटबाजी करत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके