खुल्लम खुल्ला प्यार! बाईकनंतर कपलचा कारचं सनरुफ उघडून रोमान्स, 'तो' Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:20 PM2023-01-24T12:20:51+5:302023-01-24T12:21:50+5:30

सनरूफ उघडून आलिशान कारवर कपल रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

After hug on scooty, now video of couple romancing through car's sunroof goes viral | खुल्लम खुल्ला प्यार! बाईकनंतर कपलचा कारचं सनरुफ उघडून रोमान्स, 'तो' Video तुफान व्हायरल

खुल्लम खुल्ला प्यार! बाईकनंतर कपलचा कारचं सनरुफ उघडून रोमान्स, 'तो' Video तुफान व्हायरल

Next

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये स्कूटीवर रोमान्स केल्यानंतर आता कारचं सनरूफ उघडून रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. याआधी हजरतगंजसारख्या पॉश भागात रस्त्याच्या मधोमध एका एक्टिव्हावर तरुण आणि तरुणी रोमान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अशीच घटना आता पुन्हा घ़डली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमधील लोहिया पथावर सनरूफ उघडून आलिशान कारवर कपल रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या गळ्यात हात घालून आणि किस करताना दिसत आहेत. या कारच्या मागे धावत असलेल्या कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने या दोघांच्या वागण्याचा व्हिडीओ बनवला आहे.

व्हिडीओ काढणारी व्यक्ती म्हणत आहे की, लखनौची संस्कृती अशी कधीच नव्हती, मोठ्या घरातील लोकच असे वागत आहेत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लखनौ पोलिसांनी कारवाई केली आणि व्हिडिओची दखल घेतली, तपास सुरू केला, ज्यामध्ये लोहिया पार्क ते गौतम पल्ली पोलीस स्टेशनपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले गेले आणि वाहनाचा नंबर सापडला.

या प्रकरणी एडीसीपी ट्रॅफिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे, वाहनाच्या नंबरच्या आधारे मालकाचा शोध घेतला जात आहे, लवकरच आरोपींचा शोध घेऊन मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनाखाली कारवाई केली जाईल. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: After hug on scooty, now video of couple romancing through car's sunroof goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.