सासरी परत येत नव्हती पत्नी, 100 फूट उंच टॉवरवर चढला पती; वाचा पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:28 IST2022-07-27T14:25:24+5:302022-07-27T14:28:16+5:30
Jalna : एक पती त्याच्या पत्नीसाठी टॉवरवर चढला. त्यानंतर त्याने बराच ड्रामा केला. जो बघून लोक हैराण झालेत. आता सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल(Social Viral) झाला आहे.

सासरी परत येत नव्हती पत्नी, 100 फूट उंच टॉवरवर चढला पती; वाचा पुढे काय झालं...
तुम्हाला 'शोले' सिनेमातील तो सीन तर नक्कीच आठवत असेल ज्यात वीरू नशेत बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढतो. पुढे काय होतं हे काही कुणाला सांगण्याची गरज नाही. एक असाच व्हिडीओ सध्या जालन्यातून (Jalna) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा लोकांना शोले सिनेमातील सीनची आठवण झाली. कारण एक पती त्याच्या पत्नीसाठी टॉवरवर चढला. त्यानंतर त्याने बराच ड्रामा केला. जो बघून लोक हैराण झालेत. आता सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल(Social Viral) झाला आहे.
असं सांगितलं जात आहे की, ही घटना जालना जिल्ह्यातील आहे. गणपत बकल नावाच्या व्यक्ती पत्नी बऱ्याच दिवसांपासून माहेरी गेली होती. गणपतला त्याच्या पत्नीला घरी परत आणायचं होतं. पण अनेक प्रयत्न करूनही ती सासरी येत नव्हती. त्यानंतर त्याने असं काही करण्याचा प्लान केला ज्याची कुणी कल्पना करू शकत नाही. पोलिसांनी सांगितलं की, नशेत तो 100 फूट उंचीवरील टॉवरवर चढला. त्यानंतर तो जोरजोरात ओरडू लागला होता. तो पत्नी सासरी परत येण्याची मागणी करत होता.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, त्याला खाली उतरवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. तो काहीही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर गावातील लोकांनी, बचाव दलाने आणि पोलिसांनी त्याला आश्वासन दिलं की, सगळे मिळून त्याला त्याची पत्नी घरी आणण्यासाठी मदत करतील. तेव्हा कुठे तो खाली उतरला. ही संपूर्ण घटना लोकांनी कॅमेरात कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.