VIDEO: गपचूप रस्त्याच्या बाजूला झोपला होता श्वान, अचानक तिथे आला एक गेंडा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:49 IST2022-11-17T12:49:28+5:302022-11-17T12:49:51+5:30

Rhino Street Dog Video: हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओच्या सुरवातीला एका गेंडा रस्त्यावर झोपलेल्या श्वानाजवळ अचानक येताना दिसत आहे.

Dog was sleeping quietly on the roadside suddenly rhino came and then | VIDEO: गपचूप रस्त्याच्या बाजूला झोपला होता श्वान, अचानक तिथे आला एक गेंडा आणि मग...

VIDEO: गपचूप रस्त्याच्या बाजूला झोपला होता श्वान, अचानक तिथे आला एक गेंडा आणि मग...

Rhino Street Dog Video: जगातल्या कोणत्याही देशात मोकाट श्वानांची स्थिती काही चांगली नाही. त्यांना ना नीट खायला मिळतं, ना राहण्यासाठी घर असतं. पण तरीही  मोकाट श्वानांच्या काही वागण्यामुळे लोकांना आनंद मिळतो. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओच्या सुरवातीला एका गेंडा रस्त्यावर झोपलेल्या श्वानाजवळ अचानक येताना दिसत आहे.

श्वानाजवळ पोहोचल्यावर गेंडा मान खाली करतो आणि त्याला शिंगाने मारू लागतो. तेव्हाच उन्हात झोपलेला मोकाट श्वान डोळे उघडतो. समोर दिसलेला विशाल जीव बघतो श्वान घाबरतो आणि लगेच तिथून पळायला लागतो. तिथून काही अंतरावर असलेले श्वानही त्याच्यावर भुंकू लागतात. हे समजू शकलेलं नाही की, ही घटना कुठली आहे. कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 15 नोव्हेंबरला फ्रेड शुल्त्स नावाच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला होता. 

व्हिडीओ शेअर करण्यात आल्यावर याला 4.5 मिलियनपेक्षा जास्त वेळा बघण्यात आलं आहहे. आतापर्यंत या व्हिडीओला 25 हजार रिट्वीट आणि 184,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.
 

Web Title: Dog was sleeping quietly on the roadside suddenly rhino came and then