जेवण चोरण्यासाठी या डॉगीने जे केले त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, व्हिडिओ पाहुन चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:45 IST2021-08-24T19:42:16+5:302021-08-24T19:45:40+5:30
एका कुत्र्याचा भन्नाट किस्सा सोशल मिडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या डॉगीने स्वयंपाकघरातून जेवण चोरण्यासाठी काय करामत केली?

जेवण चोरण्यासाठी या डॉगीने जे केले त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, व्हिडिओ पाहुन चक्रावून जाल
असं म्हणतात शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ. कोणतेही काम सहजपणे करण्यासाठी, एखादी व्यक्ती युक्तीचा वापर करते. परंतु, जेव्हा एखादा प्राणी अशाप्रकारे युक्तीचा वापर करतो, त्यावेळी त्याची चर्चा तर होतेच. असाच एका कुत्र्याचा भन्नाट किस्सा सोशल मिडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या डॉगीने स्वयंपाकघरातून जेवण चोरण्यासाठी काय करामत केली?
When you leave your dog alone for a minute.. pic.twitter.com/OLFvT0TF20
— Buitengebieden (@buitengebieden_) August 17, 2021
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, सर्वप्रथम डॉगीने दोन पायांनी खुर्ची ओढली. त्याचा मालक त्याला पाहत होता, पण डॉगी नेमका काय पराक्रम करतोय हे त्या मालकाला माहित नव्हते. थोड्या वेळाने जेव्हा मालक स्वयंपाकघरात गेला आणि पाहिले, त्यावेळी कुत्रा त्याच खुर्चीवर पाय ठेवून आनंदाने जेवत होता.
डॉगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. लोक या व्हिडीओवर लोक भन्नाट कमेंट्स करण्याबरोबरच लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. हा १५ सेकंदांचा व्हिडिओ तब्बल ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.