कुत्र्यानं वाचवला जीव! हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:10 IST2021-09-06T13:01:53+5:302021-09-06T14:10:43+5:30

प्राण्यांना भलेही मेंदु नसेल पण त्यांन मन हे माणसांहुनही सुंदर असतं. विशेषत: कुत्रा हा प्राणी असा आहे की तो अत्यंत प्रेमळ आणि कनवाळू असतो. अशाच एका कुत्र्यानं जीवं वाचावलाय. हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

dog saves fish, funny video goes viral on social media | कुत्र्यानं वाचवला जीव! हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही...

कुत्र्यानं वाचवला जीव! हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही...

असं म्हणतात एखादवेळेस प्राण्यांवर विश्वास ठेवता येऊ शकतो पण माणसावर विश्वास ठेवताना शंभर वेळा विचार करावा. कारण प्राण्यांना भलेही मेंदु नसेल पण त्यांन मन हे माणसांहुनही सुंदर असतं. विशेषत: कुत्रा हा प्राणी असा आहे की तो अत्यंत प्रेमळ आणि कनवाळू असतो. अशाच एका कुत्र्यानं जीवं वाचावलाय. हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती पाण्यातील मासे पकडत आहे. त्याच्यासोबत एक कुत्राही आहे. हा व्यक्ती एक एक मासा पकडून शेजारी ठेवलेल्या टबमध्ये टाकत आहे. याच दरम्यान कुत्रा टबच्या जवळ जातो आणि माशांनी भरलेला हा टब पाण्यात टाकतो. हे पाहून मासे पकडणारा व्यक्ती कुत्र्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या कुत्र्याला माशांचा जीव वाचवायचा आहे. कुत्रा या व्यक्तीला मागे ढकलतो आणि माशांना पाण्यात फेकतो.

सोशल मिडियावर हा क्युट व्हिडिओ लोकांची मनं जिंकत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ animals_dose नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

Web Title: dog saves fish, funny video goes viral on social media