हा टॉमी स्वत:लाच किती वेळ बघतोय आरशात, मग असे काही केले की तुम्ही पोट धरुन हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:59 IST2021-08-17T11:15:25+5:302021-08-17T11:59:20+5:30
सध्या अशाच एका क्यूट डॉगीचा व्हिडिओ (Cute Video of a Dog) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा आरशात पाहून मजेशीर हावभाव देत आहे आणि हे सर्व तो एन्जॉयही करत आहे.

हा टॉमी स्वत:लाच किती वेळ बघतोय आरशात, मग असे काही केले की तुम्ही पोट धरुन हसाल
प्राण्यांचे व्हिडिओज् सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणावर व्हायरल होतात. त्यातच कुत्र्याचे मजेदार व्हिडिओज पाहुन लोक पोट धरुन हसतात. सध्या अशाच एका क्यूट डॉगीचा व्हिडिओ (Cute Video of a Dog) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा आरशात पाहून मजेशीर हावभाव देत आहे आणि हे सर्व तो एन्जॉयही करत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सुरुवातीला हा कुत्रा आरशात पाहत तोंडानं काहीतरी चावत आहे आणि स्वतःचा चेहरा पाहून आश्चर्यचकीत होतो. यानंतर तो जोरजोरानं भुंकण्यास सुरुवात करतो आणि आरशातही आपल्यासारखा एक कुत्रा भुंकत असल्याचं त्याला दिसतं. काहीच वेळात हा कुत्रा आपल्यासोबत आणखी एका कुत्र्याला याठिकाणी घेऊन येतो. आरशात आणखी दोन कुत्रे पाहून तो आश्चर्यचकीत होतो आणि जोरजोरात भुंकू लागतो.
हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. नेटकरी हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत आणि यात दिसणाऱ्या कुत्र्याचंही कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ Niranjan Mahapatra नं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.