या कुत्र्याची चालाखी जगात भारी! गेला मार्केटमध्ये शॉपिंगला, फळं घेतली निवडून अन् पैसे देताना मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 16:06 IST2021-09-03T16:05:19+5:302021-09-03T16:06:36+5:30
तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? शक्य नाही! असंच तुम्ही म्हणाल ना? पण एक कुत्रा चक्क भाजी खरेदी करण्यासाठी निघालाय. आता तो भाजी घेतो की नाही आणि कशी घेतो हे पाहा तुम्हीच...

या कुत्र्याची चालाखी जगात भारी! गेला मार्केटमध्ये शॉपिंगला, फळं घेतली निवडून अन् पैसे देताना मात्र...
पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत असतात. या प्राण्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडुन विविध करामतीही करून घेतल्या जातात. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? शक्य नाही! असंच तुम्ही म्हणाल ना? पण एक कुत्रा चक्क भाजी खरेदी करण्यासाठी निघालाय. आता तो भाजी घेतो की नाही आणि कशी घेतो हे पाहा तुम्हीच...
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा आपल्या दातांच्या मदतीनं तोंडात बास्केट घेऊन येतो आणि फळं निवडू लागतो. बास्केटमध्येच पैसेही ठेवलेले असतात. विक्रेती हे पैसे घेते आणि डॉगीला सामान देते. इतकंच नाही तर विक्रेतीनं पैसे घेतल्यानंतर उरलेले पैसे परत घेण्यासाठीही हा कुत्रा तिथेच वाट बघत बसतो.
फेसबुकवर हा व्हिडिओ Woof Woof नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत २० मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी या कुत्र्याच्या हुशारीचं कौतुक केलं आहे.