VIDEO : वहिनींना डान्स करताना पाहून डान्स फ्लोरवर आला दीर, हरयाणवी गाण्यावर घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:47 IST2021-08-10T17:43:09+5:302021-08-10T17:47:20+5:30
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, वहिन्या डान्स फ्लोरवर हरयाणवी गाण्यावर डान्स करत आहेत.

VIDEO : वहिनींना डान्स करताना पाहून डान्स फ्लोरवर आला दीर, हरयाणवी गाण्यावर घातला धुमाकूळ
कोणत्याही घरात दीर आणि वहिनीची जोडी सर्वात हिट मानली जाते. हे नातं मातृत्व आणि मैत्रीचं मिश्रित रूप मानलं जातं. भारतीय लग्नांमध्ये वहिनींची भूमिका महत्वाची मानली जाते आणि अशात लग्नातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासोबतच आपल्या दिरासोबत गंमतही करत असते. सोशल मीडियावर नेहमीच दीर आणि वहिनीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ यूट्यूबवर चांगलाच गाजत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, वहिन्या डान्स फ्लोरवर हरयाणवी गाण्यावर डान्स करत आहेत. अशात दीर तिथे येतो आणि त्यांच्यासोबत डान्स करू लागतो. यूट्यूबवर हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. पण हा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. (हे पण बघा : VIDEO : लग्न झाल्यावर मंडपातच नवरी-नवरदेव खेळू लागले खेळ, इकडे-तिकडे बघून नवरदेवाने मारला चान्स)
या व्हिडीओत दोन वहिन्यांनी अशा अंदाजात डान्स केला की, त्यांना बघून कुणालाही डान्स करण्याची इच्छा होईल. डीजे फ्लोरवर डान्स करत असलेल्या वहिनींसोबत दीर जोरदार ठुमके लावत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत.