भर रस्त्यात नाचायला लागला...याचा भन्नाट डान्स बघुन लोक म्हणाले, हा तर देसी मायकल जॅक्सन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 19:06 IST2021-09-27T19:05:52+5:302021-09-27T19:06:03+5:30

एक माणूस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माणसाला देसी मायकल जॅक्सन (michael jackson) म्हणत नेटकरी त्याचा व्हिडीओ पाहत आहेत.

desi Michael Jackson man dancing on road on Michael Jackson song goes viral | भर रस्त्यात नाचायला लागला...याचा भन्नाट डान्स बघुन लोक म्हणाले, हा तर देसी मायकल जॅक्सन!

भर रस्त्यात नाचायला लागला...याचा भन्नाट डान्स बघुन लोक म्हणाले, हा तर देसी मायकल जॅक्सन!

आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. वेगवेगळ्या करामती करुन लोकांचे मन जिंकणारे लोक आपल्या देशात बरेच आहेत. कित्येक लोक तर डान्स करुन रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. सध्या असाच एक माणूस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माणसाला देसी मायकल जॅक्सन (michael jackson) म्हणत नेटकरी त्याचा व्हिडीओ पाहत आहेत.

हा माणसू अत्यंत साध्या वेशात आहे पण त्याचा डान्स पाहुन तुम्ही त्याचे चाहते व्हाल. ज्या ठिकाणी डान्स करत आहे, त्याच्या आजूबाजूला छोटी मुलं आहेत. ही मुलं टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित करत आहेत. तसेच काही मुलं त्याच्यासोबत नाचण्याचासुद्धा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्याच्या मागे सायकल तसेच इतर वाहनं येत-जात आहेत. तरीसुद्धा कशाचीही पर्वा न करता हा माणूस मजेदार डान्स करतोय.

विशेष म्हणजे हा माणूस प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सनच्या डेंजरस या गाण्यावर थिरकत आहे. कदाचित याच कारणामुळे नेटकरी त्याला देसी मायकल जॅक्सन असं म्हणत आहेत. या माणसाचा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes या अकाऊंटवर पाहायला मिळेल

Web Title: desi Michael Jackson man dancing on road on Michael Jackson song goes viral