ऑटोरिक्षा देतोय स्कॉरपिओच्या मॉडेलला टक्कर; अनोखा जुगाड पाहून कारलव्हर्स चकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 16:01 IST2023-12-03T16:00:12+5:302023-12-03T16:01:34+5:30

ऑटोरिक्षाचे बदलले रुप पाहाल तेव्हा तुम्ही गोंधळून जाणार एवढं मात्र नक्की. 

Desi jugaad carlovver converted auto rikshaw into mahindra scorpio video goes viral  | ऑटोरिक्षा देतोय स्कॉरपिओच्या मॉडेलला टक्कर; अनोखा जुगाड पाहून कारलव्हर्स चकित 

ऑटोरिक्षा देतोय स्कॉरपिओच्या मॉडेलला टक्कर; अनोखा जुगाड पाहून कारलव्हर्स चकित 

Viral Video : हल्ली सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट केला की तो क्षणार्धात व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालतो आहे. कारलव्हर्सना हा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे. एका कारलव्हर्सने आपल्या कौशल्याला कल्पनेची जोड देत एक अनोखा प्रयोग केला आहे. आपल्या ऑटोरिक्षाचे रुपडे बदलून या व्यक्तीने प्रत्येकाला सुखद धक्का दिला आहे. 

आपल्यापैकी प्रत्येकाने ऑटोरिक्षाने प्रवास केला असेल. एकंदरीत ऑटोरिक्षाची रचना, त्यातील प्रवासी मर्यादा लक्षात घेता ऑटोरिक्षाची, निर्मिती केली जाते. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये काळ्या पिवळ्या रंगाच्या ऑटोला मॉडर्न रुप दिल्याचे पाहायला मिळते आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहिला तर लक्षात येईल की ऑटोरिक्षाला पुर्णपणे स्कॉरपिओ गाडीचा लूक देण्यात आला आलाय. 

ऑटोच्या मागील बाजुने पाहिले तर हा ऑटोरिक्षा एखादी स्कॉरपिओ गाडी असल्याचा भास होतो. कोणत्याही मेकॅनिकला लाजवेल असा भन्नाट जुगाड या व्यक्तीने केला आहे. 

या एका मिनिटाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक स्कॉरपिओ रस्त्यावरून जाताना दिसते. नंतर जेव्हा रिलमेकर कॅमेरा पुढे नेतो तेव्हा खरे वास्तव समोर येते. पाठीमागून स्कॉरपिओ वाटणारी गाडी चक्क रिक्षा असल्याचे समजते. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शिवाय नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील येत आहेत.

Web Title: Desi jugaad carlovver converted auto rikshaw into mahindra scorpio video goes viral