बोंबला! अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केलं प्रपोज, महिलेने ट्विटरवर लिहिलं - 'प्लीज शाळा सुरू करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 12:33 PM2021-03-05T12:33:33+5:302021-03-05T12:33:55+5:30

ट्विटर यूजर Anti Pigeon ने ३ मार्च रोजी एक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिेले की, 'प्लीज शाळा सुरू करा'. त्यानंतर हे ट्विट चर्चेचा विषय बनलं.

Delhi student sent message be my girlfriend the girl tweeted please restart schools viral tweet | बोंबला! अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केलं प्रपोज, महिलेने ट्विटरवर लिहिलं - 'प्लीज शाळा सुरू करा'

बोंबला! अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केलं प्रपोज, महिलेने ट्विटरवर लिहिलं - 'प्लीज शाळा सुरू करा'

googlenewsNext

सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झालं आहे. कारण एका ११व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने एका महिलेला गर्लफ्रेन्ड बनण्यासाठी प्रपोज केलं आहे. या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्सपासून लोक हैराण झाले आहेत. ट्विटर यूजर Anti Pigeon ने ३ मार्च रोजी एक चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिेले की, 'प्लीज शाळा सुरू करा'. त्यानंतर हे ट्विट चर्चेचा विषय बनलं. या ट्विटला आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ६२९ री-ट्विट मिळाले आहेत.

चॅटमध्ये लिहिले आहे की, 'मी दिल्लीचा आहे...आणि सध्या ११वी मध्ये शिकतो. तुम्ही खूप सुंदर आहात. तू माझी गर्लफ्रन्ड होशील का? माझ्या वडिलांचा इथे मोठा शिपींग बिझनेस आहे. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. पण प्लीज...प्लीज...माझी गर्लफ्रेन्ड हो'.

यावर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हे फार फनी वाटत आहे तर काहींना याचा राग येतोय. पण जास्तीत जास्त लोक याचा आनंदच घेताहेत.

Web Title: Delhi student sent message be my girlfriend the girl tweeted please restart schools viral tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.