एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 17:02 IST2023-12-31T17:01:13+5:302023-12-31T17:02:08+5:30

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Delhi Metro : women pulled each other's hair and slapped, Metro fight between women, VIDEO viral | एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

एकमेकींचे केस ओढले चापटा मारल्या...मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Delhi Metro : दिल्लीमेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील कपल्स रोमान्स करतानाचे तर काही जागेसाठी महिलांच्या भांडणाचे व्हिडिओ असतात. अशातच महिलांच्या भांडणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत कोचमध्ये खूप गर्दी आहे. यावेळी दोन महिलांमध्ये काही कारणावरुन वाद होतो. यानंतर एक महिला दुसरीला गालात चापट मारते. यानंतर दोघींमध्ये तुंबळ हाणामारी सुरू होते. एका महिलेच्या मैत्रिणीदेखील दुसऱ्या महिलेला मारायला सुरुवात करतात. त्या एकमेकींना मारण्यासोबतच केसही ओढतात. यावेळी इतर महिला त्या दोघींना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात.

यावेळी अनेक प्रवासी महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ बनवत होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या घटनेवर टीकाही केली. विशेष म्हणजे, मेट्रो प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी अनेकदा इशारेही दिले आहेत. पण, प्रवाशांवर त्यांचा काहीच परिणाम होत नाही. या प्रकरणावर अद्याप मेट्रोकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Web Title: Delhi Metro : women pulled each other's hair and slapped, Metro fight between women, VIDEO viral