लेक वर्क फ्रॉर्म होम करत होती; बापानं रोज नवनवीन पदार्थ बनवून खायला दिले, व्हिडीओनं जिंकलं लोकाचं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 19:47 IST2021-02-25T19:41:49+5:302021-02-25T19:47:17+5:30
Viral Video in Marathi : व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सर्व डिशेस भिन्न आहेत. वडिलांनी दिलेल्या वागणुकीमुळे मुलगी खूप आनंदात आहे.

लेक वर्क फ्रॉर्म होम करत होती; बापानं रोज नवनवीन पदार्थ बनवून खायला दिले, व्हिडीओनं जिंकलं लोकाचं मन
इंटरनेट ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपल्याला दर सेकंदाला काहीतरी वेगळं, मजेशीर पाहायला मिळतं. अलीकडे असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. ट्विटर @sarsouura ने आपल्या टाइमलाईनवर वडीलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ पाहून त्याचे फॉलोअर्स खूप आनंदित आहेत. कारण हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
Working from home with baba is a blessing 🥺❤️ pic.twitter.com/uSLTnzvF39
— 🧚♂️سارة (@sarsouura_) February 21, 2021
या क्लिपमध्ये असे दिसून आले आहे की सोशल मीडिया युजर घरून काम करीत असताना, तिच्या वडिलांनी दररोज मधुर आणि नवीन पदार्थ बनवून त्याचे मन जिंकले. वडील दररोज मुलीसाठी चांगले अन्न शिजवत असत आणि ते एका मजेदार डॅश प्लेटमध्ये सजवत असत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सर्व डिशेस भिन्न आहेत. वडिलांनी दिलेल्या वागणुकीमुळे मुलगी खूप आनंदात आहे. "अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की, "बाबांनी घरी काम करणे हा आशीर्वाद आहे." हा व्हिडिओ आत्तापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्यावर लोक तीव्र भाष्यही करीत आहेत. वडिलांचे कौतुक करताना एका वापरकर्त्याने म्हटले की, "या व्हिडिओने मला रडवले." अनेक मुलींना लॉकडाऊनच्या काळात आपल्या पालकांच्या हातचं गरमागरम जेवण खाण्याचा अनुभव आला असावा. त्यांना हा व्हिडीओ पाहून आपल्या पालकांचे आभार मानावेसे वाटले असतील. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो