कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

By manali.bagul | Published: February 23, 2021 05:51 PM2021-02-23T17:51:48+5:302021-02-23T18:10:37+5:30

CoronaVirus News : कोरोना व्हायरसचा खरा चेहरा डॉक्टरांना पाहायला मिळाला आहे. एका रुग्णाचे उपचार करत असताना संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

कोरोनाच्या माहामारीमुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलं आहे. लाखो लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जानेवारीत लसीकरण सुरू झाल्यानंतर लोकांमधील कोरोनाची भीती कमी झालेली पाहायला मिळाली. संपूर्ण जगभरात कहर केलेल्या कोरोना व्हायरसचा खरा चेहरा डॉक्टरांना पाहायला मिळाला आहे. एका रुग्णाचे उपचार करत असताना संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

अमेरिकेतील लॉस एंजिलिसच्या रहिवासी असलेल्या एका डॉक्टरनं रुग्णाचे संपूर्ण उपचार कॅमेरात कैद केले आहेत. ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोंची सिरीज रेकॉर्ड झाली. Leica M6 and M10 कॅमेराच्या मदतीनं हे फोटो कॅमेरात कैद करण्यात आले आहेत. आतापर्यंत लॉस एंजिलिसमध्ये कोरोनामुळे १९ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनानं मृत्यू होण्याच्या वाटेवर असेलल्या रुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन डॉक्टरर्स होते. नर्स डोरिस रोल्डन एपनेफ्रिनचा डोस रुग्णांना देत होती. नर्स जेरेमी हिल सीपीआर आणि डॉ, रूबेन गुजमॅन रुग्णाचे श्वास मोजताना दिसून येत आहेत.

डॉ. न्हू- न्यूएन ले डॉ. चेस लूथर कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सूचना देताना दिसून येत आहेत. रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याचं टेंशन डॉक्टरांच्या तोंडावर दिसून आलं होतं.

कोरोना रुग्णांच्या डोक्याजवळ उभं राहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला हा रुग्ण क्वारंटाईन होता आणि श्वास घ्यायला खूप त्रास झाला. त्यानंतर या रुग्णाला रुग्णालयात हलवण्यात आलं.

६०० बेड्स असलेलं रुग्णलय पूर्ण भरल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत उपचार करायला सुरूवात केली. या फोटोत गंभीर स्वरूपात आजारी असलेल्या कोरोनाचे रुग्ण उपचार करताना डॉक्टरर्स दिसून येत आहे.

न्यूयॉर्कमध्ये रुग्णालयाच्या बाहेर टेंट्स उभारण्यात आले आहेत. सर्वत्र कोरोना रुग्णांचा कहर पहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये डॉ. स्कॉटचे सगळ्यात इमोशनल फोटो दिसून येत आहे. एका रुग्णांची काळजी घेण्यासाठी अनेक डॉक्टरर्स असतात. व्हायरसच्या भीतीनं लोक एकमेकांपासून लांब राहत असताना डॉक्टर रात्रंदिवस काम करताना दिसून येत आहेत.