ही कुत्र्याच्या पिल्लाची अन् सश्याची मस्ती पाहुन तुम्हाला आठवेल बालपण, बघा कसे नकला करतायत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:44 IST2021-08-18T17:41:21+5:302021-08-18T17:44:43+5:30
एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गंमत म्हणजे यात हे कुत्र्याचं पिल्लु एका वेगळ्याच प्राण्यासारखं वागतंय.

ही कुत्र्याच्या पिल्लाची अन् सश्याची मस्ती पाहुन तुम्हाला आठवेल बालपण, बघा कसे नकला करतायत
इवलेसे प्राणी जेव्हा एकमेकांच्या नकला करतात तेव्हा ते त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेच म्हणून समजा हे व्हिडिओ अनेकांचा दिवस आनंदाचा करतात. या व्हिडिओमधील प्राण्यांच्या नटखट अदा एखाद्या लहान बाळाप्रमाणेच वाटतात. एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गंमत म्हणजे यात हे कुत्र्याचं पिल्लु एका वेगळ्याच प्राण्यासारखं वागतंय.
Puppy thinks he’s a bunny.. 😂 pic.twitter.com/GoK4gQPX4g
— Buitengebieden (@buitengebieden_) August 15, 2021
हा व्हिडिओ ट्वीटरवर Buitengebieden या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. यात तुम्ही पाहू शकता एक छोटासा कुत्रा आणि छोटासा ससा आहे. ससा जसा उड्या मारायला सुरुवात करतो तसं ते कुत्र्याचं पिल्लुही सश्यासारखं उड्या मारतं. ससा पुन्हा मागे वळतो आणि त्याच्याकडे पाहतो. तसं तेही सश्याकडे पाहतं. पुन्हा दोघं उड्या मारायला सुरुवात करतात.
a copy cat....no...wait..
— David Blair Macrory (@SilverPlusGold) August 15, 2021
a copy-bunny with a great future on stage
😍😝🤣
— Missy Cooper 😷🍎 (@MissyCooper13) August 15, 2021
या सश्याची आणि कुत्र्याच्या पिलाची मस्ती नेटकरी भरपूर एंजॉय करत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ आवडतोय. आपल्या कमेंट्सच्या माध्यमातून ते त्यांच्या पसंतीची पावती देत आहेत.