शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रेस्टॉरंटमध्ये महिलेनं मागवला बर्गर; पहिल्याच घासात सापडलं माणसाचं बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 17:20 IST

रेस्टॉरंटमध्ये चिकन बर्गर खाताना त्यात सापडलं माणसाचं बोट; महिलेनं केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

एका महिलेनं फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये चिकन बर्गर ऑर्डर केला. ती बर्गर खायला सुरुवात करणार, त्याआधी एक धक्कादायक गोष्ट तिच्या नजरेस पडली. बर्गर खाताना असं काही घडेल याची कल्पनादेखील त्या महिलेनं केली नव्हती. बोलिव्हियातल्या एस्टेफनी बेनिटेजनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बोलिव्हियात वास्तव्यास असलेली एस्टेफनी बेनिटेज एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये बर्गर खाण्यासाठी गेली होती. तिनं पहिला घास खाल्ला. त्यावेळी तिला काहीतरी कडक वस्तू लागली. त्यामुळे बेनिटेजनं बर्गर नीट तपासून पाहिला. बर्गरमध्ये माणसानं बोट पाहून तिला धक्काच बसला. रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या घटनेचं चित्रिकरण करून तिनं व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत ६० हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे. बर्गरमध्ये सापडलेल्या बोटांचे फोटोदेखील बेनिटेजनं शेअर केले आहेत.स्पीड किती आहे रे? नितीन गडकरी सुस्साट वेगानं मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेची चाचणी करतात तेव्हा...

तयार बर्गर थेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात. आमच्यासोबत कधीही असा प्रकार घडलेला नाही, असं रेस्टॉरंटमधल्या एका ग्राहकानं सांगितलं. बेनिटेजची पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी ते शेअर केले आहेत. या घटनेवर बर्गर कंपनीनं प्रतिक्रिया दिली आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. काम करताना एका कर्मचाऱ्याचं बोट कापलं गेलं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.