युवक पाण्यात पाय टाकून बसलेला, तेवढ्यात अंगावर आली मगर; पाहा पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 17:39 IST2023-07-23T17:38:55+5:302023-07-23T17:39:57+5:30
Crocodile Shocking Video: या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, 45 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

युवक पाण्यात पाय टाकून बसलेला, तेवढ्यात अंगावर आली मगर; पाहा पुढे काय झालं...
Crocodile Shocking Video: पाण्यात राहून मगरीशी वैर नाही करायचं, अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. मगरीला 'पाण्यातील राक्षसही' म्हटले जाते. कारण, मगर आपल्या जबड्यात आलेल्या भक्ष्याचे क्षणार्धात तुकडे करते. जंगतालील हिंस्त्र प्राणीही मगर असलेल्या नदीकाठी जायाल घाबरतात. सध्या एका मगरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ती पाण्यात पाय टाकून बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर येते. पुढे काय होतं, पाहा...
हा व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या भयावह व्हिडिओमध्ये एक माणूस बोटीवर बसलेला दिसत आहे. त्याने आपले पाय नदीत सोडले आहेत. तेवढ्यात त्याच्या अंगावर एक मगर येते. पण, ही मगर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी नाही, तर त्याच्या हातातला मांसाचा तुकडा खाण्यासाठी येते.
Sir that is not a dog 😂😂 pic.twitter.com/s5SSHZOWCi
— HoodFamousTV (@HoodFamousTV_) August 1, 2022
तो व्यक्तीही न घाबरता त्या मगरीला आपल्या अंगावर घेतो आणि तिला खायला टाकतो. मांस खाऊन मगर तिथून निघून जाते. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, याला आतापर्यंत 45 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 101.7 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.