VIDEO : शाळेतील मुलींची फ्री स्टाईल फाइट तूफान व्हायरल, एकमेकींना केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:14 IST2022-08-30T12:13:15+5:302022-08-30T12:14:44+5:30

Kanpur School Girls Fight: या व्हिडीओत एका शाळेतील तीन मुलींमध्ये फ्री स्टाइल फाइट सुरू आहे. सोशल मीडिया व्हायरल झालेला हा व्हिडीओ कानपूरचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

Crazy catfight breaks between Kanpur school girls beat each other pull hair watch | VIDEO : शाळेतील मुलींची फ्री स्टाईल फाइट तूफान व्हायरल, एकमेकींना केली बेदम मारहाण

VIDEO : शाळेतील मुलींची फ्री स्टाईल फाइट तूफान व्हायरल, एकमेकींना केली बेदम मारहाण

Kanpur School Girls Fight: सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच वेगवेगळे विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे यूजर्स लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका शाळेतील तीन मुलींमध्ये फ्री स्टाइल फाइट सुरू आहे. सोशल मीडिया व्हायरल झालेला हा व्हिडीओ कानपूरचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, शाळेतील मुली यूनिफॉर्म घालून एकमेकींचे केस ओढत आहेत आणि एकमेकींना मारहाण करत आहेत. एकमेकींवर आरोप लावत त्या एकमेकींनी मारहाण करत आहेत. यादरम्यान दुसऱ्या मुली त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्या काही थांबत नाहीत. यांच्यातील भांडणाचं नेमकं कारण काय हे काही समजू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत 85 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ 300 पेक्षा जास्त यूजर्सने रिट्विट केलाय. त्यामुळे हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झालाय. लोकांना यांच्यातील झालेल्या भांडणाचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 

Web Title: Crazy catfight breaks between Kanpur school girls beat each other pull hair watch