Coronavirus : एक नंबर! कोरोनापासून बचावासाठी पुणेकरांची भन्नाट आयडिया, तुम्हीही जगा इतरांना जगू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:03 PM2020-03-25T13:03:44+5:302020-03-25T13:17:32+5:30

कोरोनापासून बचावासाठी सोशल सिस्टंसिंग हा एकमेव उपाय असून पुण्यातील काही दुकांनावर यासाठी भन्नाट आयडिया करण्यात आली आह.

Coronavirus : Pune authorities innovative idea to save society from infection api | Coronavirus : एक नंबर! कोरोनापासून बचावासाठी पुणेकरांची भन्नाट आयडिया, तुम्हीही जगा इतरांना जगू द्या!

Coronavirus : एक नंबर! कोरोनापासून बचावासाठी पुणेकरांची भन्नाट आयडिया, तुम्हीही जगा इतरांना जगू द्या!

googlenewsNext

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशभरात लॉकडाउन करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे लोकांनी किराणा दुकाने आणि भाजीच्या दुकानांवर तौबा गर्दी केली होती. मुळात सोशल डिस्टंसिंगसाठी लॉकडाऊन केलं जात आहे, अशात लोकांनी असं एकाएकी बाहेर पडणं अपेक्षित नाहीय.

पण लोक ऐकायला तयार नाहीत. मंगळवारी रात्री दुकांनाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान काही दुकानांचे असे फोटो व्हायरस झाले आहेत ज्यांची प्रशंसा केली गेली पाहिजे. काही भागातील प्रशासनाने आणि दुकानदारांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी फारच चांगला पर्याय शोधला आहे.

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोशल डिस्टंसिंगसाठी काही किराणा आणि भाजी दुकानदारांनी सर्कल केले आहेत. जेणेकरून लोकांमध्ये अंतर राहिल. पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे इथेही प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगची ही आयडिया वापरली आहे. ज्याची सध्या सर्वात जास्त गरज आहे.

पुण्यात सध्या कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात दुकानदारांनी अशी व्यवस्था केली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा ती वापरली पाहिजे. तरंच लोक एकमेकांपासून अंतर ठेवू शकतील. 

अशीप्रकारची सोशल डिस्टंसिंगची आयडिया नोएडामध्येही करण्यात आली आहे. येथील सेक्टर 19 मध्येही दुकानातही असं ग्राहकांना उभं राहण्यासाठी सर्कल करण्यात आले आहेत. हे सगळ्यांनी केलं तर कदाचित कुणालाच कोरोनाची लागण होणार नाही.

गुजरातमध्ये असंच करण्यात आलं असून तेथीलही एक फोटो व्हायरल झाला आहे. या गंभीर स्थितीत इतरांनाही सुद्धा अशीच आ़यडिया वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


Web Title: Coronavirus : Pune authorities innovative idea to save society from infection api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.